*श्री पांडुरंग साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना सर्वाधिक ऊस दराची परंपरा कायमच ठेवणार = चेअरमन प्रशांतराव परिचारक*

*श्री पांडुरंग साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना सर्वाधिक ऊस दराची परंपरा कायमच ठेवणार = चेअरमन प्रशांतराव परिचारक*

-----------------------------------------------------------------------------
सभासद शेतकरी यांच्या हितासाठी सतत प्रयत्न करणार...            --------------------------------------------------------------------------

माळशिरस (प्रतिनिधी ):- श्रीपूर श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये गाळप केलेल्या उसात जिल्ह्यात सर्वाधिक एफ आर पी देऊन जिल्ह्यात एक नंबर वरती राहण्याचा मान कायम ठेवला आहे. गाळप झालेल्या उसात सर्वाधिक २६२६ रुपये प्रति मे. टन क्रमाने एफ आर पी ची संपूर्ण रक्कम तसेच एक एप्रिल २०२२ नंतर ऊसतोड झालेल्या शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन २७२६ प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी दिली.

पुढे बोलताना परिचारक म्हणाले. की कारखान्याने यापूर्वी २४२६ रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे. उर्वरित देय असणारी प्रति मेट्रिक टन २००रुपये प्रमाणे रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी म्हणाले की चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी सुधाकर परिचारक यांच्या पावलावर पाऊल ठेवून एफ आर पी क्रमाने निघणारी ऊस दराची  रक्कम शेतकरी यांना शेती खर्चासाठी तसेच दसरा दिवाळी सणासाठी अदा करून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्याचा सतत प्रयत्न केला.

यावेळी कारखान्याची व्हा. चेअरमन कैलास खुळे. दिनकर मोरे. वसंत नाना देशमुख. हरीश गायकवाड. उमेश परिचारक. दिलीपराव चव्हाण. ज्ञानदेव ढोबळे. तानाजी वाघमोडे. बाळासाहेब यरमार. भगवानराव चौगुले. भैरव वाघमारे. लक्ष्मण धनवडे. भास्कर कसगावडे. गंगाराम विभूते. सुदाम मोरे. विजय जाधव. हनुमंत कदम. किसन सरवदे. शामराव साळुंखे. राणू पाटील इत्यादी सभासद शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.*