चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते खेड भाळवणीतील देवीची महाआरती संपन्न..
*****************************************************
पंढरपूर;(प्रतिनिधी):- खेड भाळवणी येथील जय भवानी नवरात्र उत्सव तरुण मंडळ छत्रपती शिवाजी नगर या तरुण मंडळानी नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गादेवीच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली होती त्यानिमित्त विठ्ठल परिवाराचे नेते तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील यांच्या शुभ हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी बोलताना चेअरमन अभिजीत आबा पाटील पाटील म्हणाले की येथील तरुण मंडळाने स्थापन केलेल्या दुर्गा मातेच्या देवीची पूजा व सेवा करण्याचा मला योग आला असून मी भाग्य समजतो त्याचप्रमाणे तालुक्यातील गोरगरीब शेतकरी सभासद यांची देखील सेवा श्री विठ्ठल दुर्गा मातेच्या आशीर्वादाने सेवा करण्याची संधी देऊन त्यांच्या जीवनात सुख समाधान मिळावे असे यावेळी सांगितले. चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचा स्वागतपर मंडळाचे अध्यक्ष सचिन साळुंखे यांच्या हस्ते जंगी स्वागतपर सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन दादा साळुंखे .सुधाकर पवार .अतुल पवार .शरद पवार. समीर पवार . गणेश साळुंखे.शहाजी तुकाराम साळुंखे. शहाजी नारायण पवार . शहाजी पाटील.इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.