वसंतराव काळे साखर कारखान्याचे निवडणूकी निमित्त - कल्याणराव काळे यांच्या मदतीला ; समाधान काळे गाव भेटीच्या मैदानात- गादेगाव मधून सुरुवात.

वसंतराव काळे साखर कारखान्याचे निवडणूकी निमित्त - कल्याणराव काळे यांच्या मदतीला ; समाधान काळे गाव भेटीच्या मैदानात- गादेगाव मधून सुरुवात.

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) : वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक यंदा अटीतटीचे होणार असून दोन्ही कडील उमेदवारांचे अर्ज काढण्याची मुदत काही दिवसावर आली असताना विठ्ठलाचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी वाडी कुरोली येथून निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांच्यावर पाटील यांनी चक्क त्यांच्या गावात येऊन आरोपांच्या भडीमार केल्याने त्या आरोपात उत्तर देण्यासाठी समाधान काळे हे आपले बंधू कल्याणराव काळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून या प्रतिष्ठेची बनलेल्या निवडणुकीत आपला कारखाना टिकवण्यासाठी युवा गर्जनाचे संस्थापक युवा नेते समाधान काळे यांनी आपली स्वतंत्र प्रचार यंत्रणा उभी करून युवक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मैदानात उतरले असल्याने तरुणाई मध्ये उत्साह निर्माण झाला असून समाधान काळे हे पाटील यांच्या आरोपात प्रतिउत्तर म्हणून साजेल असे दमदार भाषण शेतकरी सभासद यांच्या गाव भेटीदरम्यान करीत आहेत त्यामुळे गावोगावी त्यांची क्रेज निर्माण होत आहे तसेच विरोधकांकडून होत असलेल्या आरोपाचे खंडण करण्यासाठी वैयक्तिक गाटी भेटी वर जोर दिला आहे.

या या गाठीभेटी दरम्यान बैठकीतून स्वर्गीय वसंतराव दादा काळे यांनी पुढील दूरदृष्टी ठेवून तालुक्यातील सामान्य शेतकऱ्यांचा ऊस गाढवा अभावी बांधावर पडत होता म्हणून अहो रात्र परिश्रम घेऊन सभासदांना आपला ऊस व्यवस्थित गाळप करण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी भाळवणीच्या माळरानावर चंद्रभागा कारखान्याची निर्मिती केली स्वर्गीय दादांच्या नंतर थोरले बंधू कल्याणराव काळे यांनी कारखाना व्यवस्थित चालवत असल्यामुळे सतत काही ना काही अडथळे निर्माण करून काही विघ्न संतोषी लोकांना मोठी स्वप्ने पडू लागल्याने आपल्यातीलच काही बगलबच्चन कारखाना सुव्यवस्थेत चाललेला पाहवत नसल्याने स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी विद्यमान चेअरमन काळे साहेबांवर काही ना काही आरोप करीत आहेत, ही प्रवृत्ती रोखण्यासाठी इथला सभासद जागृत आहे . त्यासाठी कार्यकर्त्याने दक्ष राहावे असे आवाहन समाधान काळे स्वतः सभासदांपर्यंत जाऊन करत आहे. पुढे  बोलताना समाधान काळे म्हणाले की , वसंतदादा काळे यांनी चंद्रभागा सहकारी साखर कारखाना, उभारणीसाठी १४ वर्षे आपल्या हयात घालवली. वीस वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांसाठी सभासदासाठी आर्थिक उन्नती साधण्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले. असल्याचे समाधान काळे यांनी आवर्जून सांगितले.

समाधान काळे यांच्या गावभेटी दौऱ्यास गादेगांव येथे असंख्य शेतकरी सभासद तरुण युवक कार्यकते उपस्थित उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यापार व  उद्योग सेलचे राज्य प्रमुख तथा वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नागेश  फाटे, माजी संभाजी बागल, अरुण बागल,  पै.गणपत बागल, गोरख बागल, डॉ .रमेश बागल, विक्रम बागल, प्रदीप बागल, पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश देठे ,भारत कोळेकर, बाबा हाके, सिताराम कोळेकर, बंडू पवार, दादा खरात, जालिंदर गोपने, भारत पडळकर भागवत महानवर, तानाजी गोफने, समाधान पाटील, शिवाजी गोफने, मधुकर हाके, दत्तात्रय बंडगर, पाटलू पाटील, मधुकर पाटील, शिवाजी कोळेकर इ .सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.