बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयास युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद

बार्शीच्या  शिवाजी महाविद्यालयास युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद

--------------------------------------------------------------------------------------
बार्शीच्या शिवाजी शिक्षण संकूलनात आनंद उत्सव साजरा
--------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अठराव्या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम पारितोषिक बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने ९१ गुणासह पटकावले. मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा ११ युवा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला .बुधवारी पारितोषिक वितरणाचा समारंभ करण्यात आला.

*यावेळी सिने अभिनेत्री सैराट फिल्म रिंकू राजगुरू आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाचे प्र .कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यापीठाच्या कुलसचिवा योगिनी घारी दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेजचे अध्यक्ष सुजित कदम वित्त व लेखा अधिकारी श्रेणिक शहा .तेजस्वी कदम .प्रियदर्शनी महाडिक विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे डॉ. गुणवंत सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरणाचा कार्यक्रम पार पडला .तसेच दुसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद ५० गुणांसह सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजने तर अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाने ४९ गुण घेऊन तिसरी पारितोषिक पटकावले .नाट्य  ललित व वागमय या तिन्ही विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद बार्शीच्याच शिवाजी  महाविद्यालयाने पटकावले. नृत्य विभागाचे पारितोषिक सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आधी विभागास मिळाले. संगीत विभाजनाचे सर्वसाधारण विजेतेपद दयानंद कॉलेज सोलापूर यांना मिळाले. सांगोल्याची तृप्ती गोल्डन गर्ल तर बार्शीचा सुरज गोल्डन बाँय युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गोल्डन गर्ल तर विद्यार्थ्यास गोल्डन बॉय चा किताब दिला जातो. यंदाच्या गोल्डन गर्ल ची मानकरी सांगोला कॉलेज सांगोल्याची तृप्ती बेंगलोर कर तर गोल्डन बॉईज चा किताब बार्शीच्या  शिवाजी  महाविद्यालयाचा विद्यार्थी सुरज काळे यांनी पटकावला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी मानले. बार्शी येथील शिवाजी महाविद्यालया तील विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भारती रेवडकर ,शिवाजी शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे ,संस्थेचे अध्यक्ष बी. वाय .यादव. सचिव पी. टी .पाटील .सहसचिव अरुण देबडवार .खजिनदार बापूसाहेब शितोळे. यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.