पंढरपूर शहर व तालुक्यात होतोय मोठ्या प्रमाणात डेंगूचा फैलाव
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर प्रतिनिधी : नुकतीच उन्हाची चाहूल लागली असताना पाऊस पुन्हा एकदा जोरदार लागला आहे .यामुळे ऐनवेळी पाऊस पडणार असून अशातच पंढरपूर नगरपालिकेचा व तालुक्यातील वैद्यकीय आरोग्य विभाग सुस्त असल्याचे पाहावयास मिळत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पंढरपूर शहर व तालुक्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यातील अनेक भागात सध्या खोकला तापाचे रुग्ण सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वातावरणातील विचित्र बदलामुळे देखील हा परिणाम होत असल्याचे तज्ञाचे मत आहे.
यंदा राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राज्यात ३५८६ रुग्णांना स्वाईन फ्लूचा संसर्ग झाला आहे. ऊन पावसामुळे साथीच्या तापाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तर बारीक पावसामुळे डेंगू डासाचा डंक जीव घेना ठरू लागला आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, पोटदुखी , यासारख्या आजाराने नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. पंढरपूर शहरात सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले असून त्याची दुर्गंधी येत आहे. या सगळ्या गोष्टीची नगरपालिकेला काही देणे घेणे नसल्याचे वाटत असून.
पंढरपूर नगरपालिकेने मागील काही दिवसात स्वच्छता अभियान सर्वेक्षणात गल्लीत नापास दिल्लीत पास असा तिसरा क्रमांक मिळवला आहे. त्या आनंदातच नगरपालिकेचे अधिकारी मजबुल असल्याचे दिसत असून त्यांना डेंगूच्या फैलावाबाबत काहीच काळजी नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.