जिल्हास्तरीय शालेय डॉजबाल स्पर्धेत गादेगांवच्या शिवरत्न जुनिअर कॉलेज१७ वयोगटात जिल्ह्यात प्रथम

जिल्हास्तरीय शालेय डॉजबाल स्पर्धेत गादेगांवच्या शिवरत्न जुनिअर कॉलेज१७ वयोगटात जिल्ह्यात प्रथम

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल  स्पर्धा मंगळवेढा येथे पार पडल्या यामध्ये जिल्ह्यातून जवळपास 45 संघानी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये शिवरत्न जुनिअर कॉलेज गादेगाव मधील 17 वर्षे वयोगटातील मुली जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला .त्याचबरोबर 19 वर्षे वयोगटातील मुले वर्ष वयोगटातील मुले व 19 वर्षे वयोगटातील मुली यांनी दुसरा क्रमांक मिळवला त्याचबरोबर सतरा वर्षीय  मुले यांनी तिसरा क्रमांक पटकावला या सर्व खेळाडूंना कोच म्हणून विजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे सर यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर सहशिक्षक दिपक देशमुख, राजेंद्र मोलाणे ,सोमनाथ भुईटे ,नागेश कांबळे, नियाज मुलाणी, अजय मोरे ,संतोष पवार, वर्षा मोरे ,शितल बागल, श्रीमती पटेल, शितल मस्के,स्वाती रकटे ,सुधा गायकवाड यांनी अभिनंदन केले. पुढील विभागीय स्पर्धा सप्टेंबर महिन्यामध्ये अहमदनगर येथे होणार आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  गादेगाव ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.