पंढरपुर शहर पोलीस ठाणे, "गुन्हे प्रकटीकरण शाखेची" धडाकेबाज कामगिरी. ◾जुना कराड नाका घरफोडीतील महिला आरोपी कडुन ५.५० तोळे सोन्याचे दागीने केले जप्त.

पंढरपुर शहर पोलीस ठाणे, "गुन्हे प्रकटीकरण शाखेची" धडाकेबाज कामगिरी.   ◾जुना कराड नाका घरफोडीतील महिला आरोपी कडुन ५.५० तोळे सोन्याचे दागीने केले जप्त.

--------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज):- पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं.५४७/२०२६ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०५ (अ), प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्हयातील फिर्यादी सचीन ज्ञानेश्वर ताटे रा.जुना कराड नाका पंढरपूर यांनी त्यांचे घरात कपाटामध्ये सोन्याचे दागिने ठेवून कपाटाची चावी ठेवली होती. फिर्यादींनी ठेवलेले ५.५० तोळे वजनाचे सोन्याचे दागीने हे दि. २९/०६/२०२६ रोजी सकाळी ०८:३० वा.ते ०८/०८/२०२६ रोजीचे सकाळी ०७:३० वा.चे दरम्यान अज्ञात चोरटयाने चोरले बाबत गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्हयाचे तपासकामी पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील तपास पथकाने तपास पथके तयार करून तपास केला असता, तांत्रीक बाबीचे विश्लेषन करून तसेच गोपनीय बातमीदारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्य पूर्ण तपास करून सदर गुन्हयाची उकल केली आहे. यामध्ये फिर्यादी यांनी त्यांची आजारी आई हिचे देखभाली करीता वनिता समाधान कांबळे रा. टाकळी रोड पंढरपूर यांना कामावर ठेवले होते. सदर महिला वनिता कांबळे हिचा फिर्यादीचे घरामध्ये वावर असल्याने तीने या गोष्टीचा फायदा घेवून फिर्यादीचे संमत्तीवाचून घरातील लपवलेली चावी घेवून कपाट उघडून सदर दागीन्यांची चोरी केली आहे. सदर आरोपीस विश्वासात घेवून तपास केला असता, तीने दागीने चोरल्याचे कबूल करून सदरचे दागीने आपले घरात लपवून ठेवले असल्याचे सांगितले असल्याने चोरीस गेलेले दागीने आरोपी कडून जप्त करण्यात आले आहेत.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक प्रेरणा कटटे मॅडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री. महेश ढवाण यांचे मार्ग दर्शनाखाली, पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोफौ. सुजित उबाळे, पोहवा. २७४ अनिल बनसोडे, पोहवा. १४१३ अस्लम काझी, पोहवा. १७८९ सचिन हेंबाडे, पोहवा. ८०५ गणेश पवार, पोहवा. १५८३ मोरे, पोहवा. १४८ मोरे, पोकॉ. १२४० हर्षद ठाकर, पोशि. १२१६ शहाजी मंडले, पोकॉ. १३०४ नवले, तसेच सायबर पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण चे पोकॉ. १८८७ प्रविण मेटकरी, यांनी केली आहे. पुढील तपास पोहेका /२७४ अनिल बनसोडे हे करीत आहेत.