ग्रंथमिञ गुलाबराव पाटील राज्य ग्रंथालय संघाच्या प्रमुखकार्यवाहपदी तर कार्याध्यक्षपदी सोपानराव पवार यांची निवड.

ग्रंथमिञ गुलाबराव पाटील राज्य ग्रंथालय संघाच्या प्रमुखकार्यवाहपदी तर कार्याध्यक्षपदी सोपानराव पवार यांची निवड.

-----------------------------------------------------

सांगोला (अमर कुलकर्णी ):- महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाची महत्वपूर्ण राज्य कार्यकारिणी बैठक नुकतीच कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत राज्य ग्रंथालय संघाच्या प्रमुख कार्यवाहपदी ग्रंथमिञ गुलाबराव पाटील (सांगोला) तर कार्याध्यक्षपदी ग्रंथमिञ सोपानराव पवार (पुणे) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सांगोला तालुका ग्रंंथालय संघाचे संस्थापक, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे मा. अध्यक्ष ,विद्यमान कार्यकारणी सदस्य, ग्रंथालय चळवळ परिवाराचे सन्माननीय जेष्ठ सदस्य, कुटुंबप्रमुख ग्रंथमिञ गुलाबराव पाटील गुरुजी यांची गत रविवारी सोलापूर जिल्हा प्रा.शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादीत सोलापूर व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ही त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले. अत्यंत विनम्र स्वभावाचे गुलाबराव पाटील यांच्याकडे विविध गुणांचा खजिनाच आहे सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाचन चळवळ व सहकार यातील त्यांचे कार्य अत्यंत वाखाण्याजोगे आहे

निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघातर्फे सत्कार करण्यात आला. ग्रंथालय चळवळ अधिक बळकट करण्यासाठी बैठकीत अनेक महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. ग्रामपंचायत क्षेत्रात 15 व्या वित्त आयोगातून ग्रंथालयांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. ग्रंथोत्सव शासनाने जिल्हा ग्रंथालय संघाच्याच माध्यमातूनच राबवावा, अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली.

ग्रंथमिञ डॉ. गजानन कोटेवार यांनी मार्गदर्शन करताना राज्यातील ग्रंथालय चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

या प्रसंगी पांडुरंग सूर्यवंशी, एस. एस. पाटील, किशोर जाधव, दिलीप कोरे, मंगेश मस्के, रवींद्र कालेकर, रमेश सुतार, राजू ढमाले, मधुकर सुतार व पुष्पा पाटील यांसह राज्यभरातील मान्यवर उपस्थित होते. 

स्वागत कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुशांत मगदूम यांनी केले. प्रास्ताविक राज्य संघाचे कोषाध्यक्ष भीमराव पाटील यांनी मांडले, तर कार्योपध्यक्ष ग्रंथमिञ राम मेखले यांनी उपस्थितांचे आभार मानले.