मंगळवेढा पोलीसांनी गहाळ झालेले 25 मोबाईल मुळ मालकांना केले परत.
---------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज) :-
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे गहाळ व चोरीला गेलेले 7 लाख 45 हजार रुपये किंमतीचे 25 मोबाईल मुळ मालकांना दि.15 ऑगस्ट रोजी पोलीस प्रशासनाच्यावतीने परत करण्यात आल्याने त्यांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत होता.
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातून जवळपास नागरिकांचे 25 मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी पोलीसात प्राप्त झाल्या होत्या. दरम्यान पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे,डी.वाय.एस.पी.डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व पोलीस अंमलदार शरद कदम यांनी सी.ई.आय.आर पोर्टल व इतर तांत्रीक बाबींच्या आधारे महाराष्ट्र सह इतर राज्यातून गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करण्यात पोलीस प्रशासनास यश आले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात खलिद काझी,भारत मेटकरी,शिवाजी मेटकरी, सागर भजनावळे, विकास पुजारी,अमोल सुतार,महादेव कापले,ज्ञानेश्वर पवार,मिनाक्षी कोरे, शिवानंद पाटील,प्रतिक किल्लेदार,अलिफ सुतार,अमोल आठवले, अरिफ मनियार, प्रियांका आठवले, वैष्णवी डोंबे,सचिन घुले, मधू गरंडे, विकास घोडके, अरविंद कुमार,गणपती कांबळे,सिध्दाराम बेळे व इतर 3 असे एकूण 25 जणांना ते मोबाईल परत करण्यात आले आहेत.
फोटो ओळी
मंगळवेढा पोलीस ठाण्यात मुळ मालकांना मोबाईल परत करताना डी.वाय.एस.पी.डॉ.बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व अन्य पोलीस कर्मचारी व मुळ मालक छायाचित्रात दिसत आहेत.