सरपंच विनायक यादव यांचा मंगळवेढ्यात जंगी सत्कार..

सरपंच विनायक यादव यांचा मंगळवेढ्यात जंगी सत्कार..

----------------------------------------------------------------------------------- 

मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज ) मंगळवेढा तालुक्यातील मारापुर ग्रामपंचायत विनायक यादव यांची महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या मंगळवेढा तालुकाअध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान आवताडे यांच्या मंगळवेढा येथील संपर्क कार्यालयात युवक नेते सोमनाथ  अवताडे यांच्या शुभ हस्ते जंगी सत्कार करण्यात आला.

सरपंच विनायक यादव यांनी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली मारापुर ग्रामपंचायतची निवडणूक एक हाती सत्ता मिळवली होती .त्यामध्ये विनायक यादव यांची सरपंच म्हणून मोठ्या मताच्या फरकाने निवड झाली होती .सरपंच विनायक यादव हे गाव पातळी येथे तालुक्यातील सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांची जाण समोर ठेवून त्यांनी तालुक्यातील सरपंचाच्या अडीअडचणी सोडवून त्यांना दिशा देण्याचे काम करून अभ्यासू कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली अभ्यास व कार्यशैली व उत्तम संघटन कौशल्य यांची दखल घेऊन त्यांची मंगळवेढा सरपंच सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

या कार्यक्रमास पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांचे विश्वासू व मंगळवेढा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे श्री .संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजन पाटील, संत चोखामेळा नगराचे सरपंच शिवाजी सरगर, मंगळवेढा नगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे  सदस्य दिगंबर यादव, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी ,माजी उपसरपंच सतीश मोहिते ,अशोक लेंडवे ,बाबा कोंडभैरी ,जनार्धन लेंडवे आदर्श शिक्षक सतीश पवार ,आमदार समाधान आवताडे यांची स्वीय सहाय्यक सचिव रावसाहेब फाटे ,विकास पुजारी ,सचिन माने इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.