शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास हातात रुमणे घेऊन बसावे लागेल = खासदार उदयनराजे भोसले
******************************************************** -: भाजप सरकारला घरचा आहेर:-
_____________________________________________________
सातारा;(प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष केले जर आपल्या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. आज आपण खूर्चीत बसतोय. पण, उद्या रुमणे घेऊन बसावे लागेल, असा इशारा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यकर्त्यांना दिला.
भाषण करतानाच उदयनराजेंनी अचानक व्यासपीठावरून खाली उतरत पाऱ्यावर येऊन मांडी घातली. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना त्यांनी आगपाखड केली.
सातारा शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर छत्रपती कृषी औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत व खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. देशातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना उदयनराजेंनी आगपाखड केली. भाषण करतानाच अचानक त्यांनी व्यासपीठावरून खाली पाऱ्यावर येत मांडी घातली.
ते म्हणाले, आज आपण खूर्चीत बसतोय, उद्या हातात रुमणे घेऊन बसावे लागेल. ज्या वेळेस लोक स्वतःच्या हातात सत्ता घेतील आणि म्हणतील लोकप्रतिनिधी व प्रशासनाला ओळखत नाही. अशी परिस्थिती देशाची होऊ देऊ नका. हे सर्व देशवासियांच्या हातात आहे. आपण जास्त छातीठोकपणे सांगतो. सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे. या देशात सर्व जाती, धर्माचे लोक राहतात. पण या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. सोमालिया सारखी अवस्था आपल्या देशाची व्हायला वेळ लागणार नाही. आज आपण खूर्चीत बसतोय. पण, उद्या वाडगं घेऊन बसणार का, आपल्या भावी पिढीची काय अवस्था करायची आहे. तुम्हाला प्रगतीचा मार्ग कळायला पाहिजे. तुम्ही सुज्ञ आहात. अनेक लोक म्हणतात काहीतरी स्वार्थ असतात म्हणून करतात. माझाही स्वार्थ आहे, तो म्हणजे तुमचे कल्याण झाले पाहिजे.