*भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी श्री शांताराम गाजरे यांची निवड:-*
___________________________________________________
*पंढरपूर( प्रतिनिधी):-* शेळवे (तालुका ) पंढरपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री शांताराम गाजरे गुरुजी यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी महाराष्ट्र या संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाले बद्दल पंढरपूर तालुक्यात सर्व स्तरातून निवडीचे स्वागत करण्यात येत असून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या संघटनेने शांताराम गाजरे गुरुजी यांच्या साहित्य कला शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात त्यांच्या कामाची आवड पाहून साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी व विविध समस्या सोडवून योगदान दिल्याबद्दल या कामाची दखल घेऊन राज्य संघटनेने त्यांची सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली .असल्याची माहिती भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच कथा फ्रीडम स्टोरी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विशाल शिरसाट यांनी यांनी निवड केली . राज्य संघटनेच्या कोषाध्यक्ष छाया डिसले. सचिव ओंकार मेहेर. महिला आघाडीच्या अध्यक्षा चैताली कापसे, प्रदेश कार्याध्यक्ष सुमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. शांताराम काळे गुरुजी हे सध्या पंढरपूर येथील बाळासाहेब काळे प्राथमिक शिक्षक पतसंस्था पंढरपूर चेअरमन म्हणून काम पाहत असून त्यांचे विविध सामाजिक राजकीय सवंगडीशी संबंध असून ते सर्वांशी मनमिळावू असल्याने त्यांच्या नावावर आजपर्यंत आदर्श शिक्षक पुरस्कार. आचार्य दादासाहेब दोंदे जीवनगौरव पुरस्कार. गुणवंत शिक्षक पुरस्कार इत्यादी ढीगवर पुरस्कार मिळाले आहेत .त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते बाळासाहेब काळे (गुरुजी), प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नागनाथ क्षिरसागर, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार,पंढरपूर चे गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन उत्तमराव जमदाडे पंढरपूर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष रामभाऊ यादव आणि कार्याध्यक्ष जोतिराम बोंगे, पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन पाटील, आणि सर्व शिक्षक व भगिनी यांनी अभिनंदन केले.