पंढरपूर नगर परिषदेने वाढवली करवाढ रद्द करावी - काळे, भालके ,पाटील गटाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) नगरपरिषदेने वाढविलेली करवाढ रद्द करावी व नागरिकांना आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण, स्वच्छता, रस्ते वगैरे सुविधा देण्यावर भर देण्यात यावा.अशी मागणी नागपूर येथील अधिवेशन दरम्यान आज राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, यांचेकडे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कल्याणराव काळे , श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, माजी संचालक गणेश पाटील यांनी केली.
निवेदनाची दखल घेऊन तातडीने वाढीव करवाढ रद्द करण्याचे तात्काळ आदेश पंढरपूर नगरपरिषदचे प्रशासक तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले. त्यामुळे पंढरपूर व हद्दवाढ भागातील नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे. यावेळी करमाळ्याचे आमदार संजय (मामा) शिंदे,संतोष सुळे उपस्थित होते.