*पंढरपूर शहर पोलिसांची दमदार कामगिरी मात्र महसूल खात्याचे अधिकारी झोपेच्या सोगांत:-*

*पंढरपूर शहर पोलिसांची दमदार कामगिरी मात्र महसूल खात्याचे अधिकारी झोपेच्या सोगांत:-*

----------------------------------------------------------------------------------

भीमा नदीच्या पात्रातून वाळू वाहतूक करणारी २५ गाढवं पोलिसांच्या ताब्यात...

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( प्रतिनिधी ):- येथील भीमा नदीच्या पात्रातून वेगवेगळ्या ठिकाणी भरलेल्या एक ब्रास वाळू वाहतूक करणारी २५ गाढव शहर गुन्हे प्रकटन शाखेच्या पोलीस पथकाने पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संत पेठ परिसरात रात्रीच्या वेळी गस्त घालत असलेल्या पोलीस पथकाला भीमा नदीच्या पात्रात वाळू चोरी करत असल्याची खबर मिळाली.

त्यानुसार पोलीस पथकाने पाहणी केली असता संत सावता माळी मठाजवळ ठिक्यामध्ये भरलेल्या वाळूची वाहतूक करणारी दहा गाढव दिसून आली. प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे एक लाख रुपये किमतीची १० गाढव व तीन हजाराची अर्धा ब्रास वाळू पोलिसांनी जप्त करून शहर पोलीस ठाण्यात आणली त्यानंतर कुंभार घाट परिसरातही पाहणी करण्यात आली असता  त्या ठिकाणी वाळूची चोरटी वाहतूक करताना  १५ गाढव पोलिसांना दिसून आली या ठिकाणी एकूण एक लाख ५० हजार रुपये किमतीची गाढव आणि तीन हजार रुपये किमतीची अर्ध्या ब्रास वाळू पोलिसांनी जप्त केली दोन्ही ठिकाणी पोलिसांचा सुगाव लागतच गाढवाचे मालक क्षणार्धात पसार झाले.

पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकातील  पोलीस नाईक बाजीराव काकडे व पोलीस कॉ. समाधान माने यांनी याप्रकरणी संबंधित गाढवाच्या मालका विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.