राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव येथे राजा राममोहन राॅय व कर्मवीर भाऊराव पाटील याना अभिवादन:-
------------------------------------------------------------------------------
प्रतिनिधी:- रावगाव. ता. करमाळा येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयात शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील व सति प्रथा बंदिचे जनक राजा राममोहन राॅय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिमा पूजन आम आदमी पार्टीचे करमाळा तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे व मकाई सहकारी साखर कारखान्याचे लेबर ऑफीसर भाग्येश्वर बरडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गाव कामगार पोलीस पाटील बापूसाहेब पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लालासाहेब जाधव, छञपती क्रांती सेना तालूका अध्यक्ष बाबूराव पाटील, राजेंद्र बुधवंत, महादेव बुधवंत,सय्यद एजाज अंगारशा,रिटे वाचक उपस्थित होते.
सर्व उपस्थितांचे आभार सचिव भास्कर पवार यांनी मानले.