पंढरपूर शहरात हातभट्टी व विदेशी दारूचा साठा पोलिसांकडून जप्त ◼️ शहर पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई.
-----------------------------------------------------
पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज) :-पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत इंद्रप्रस्थ बिंल्डींग च्या पाठीमागे येथे इसम प्रतापसिंग वसंतसिंग ठाकूर हा हातभट्टी दारु व विदेशी दारुची चोरुन विक्री करत आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली असून सदर ठिकाणी जावून आपण कारवाई करावी असे आदेश दिल्याने पोह/186 रोंगे पोकाँ/624 घायाळ असे वरील बातमीच्या ठिकाणी जावून खात्री केली असता एक इसम पाण्याच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्याच्या ढिंगाऱ्या खाली वेगवेळया पिशव्या मधून हातभट्टी व विदेशी दारु बाटल्या विक्री करत असताना दिसून आल्याने आम्ही त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव विचारता त्यांने त्याचे नाव प्रतापसिंग वसंतसिंग ठाकूर रा.इंद्रप्रस्थ बिंल्डींग च्या पाठीमागे पंढरपूर असे सांगितले आम्ही प्लास्टीकच्या रिकाम्या बाटल्याच्या बाजूला सारुन पाहिले असता त्याठिकाणी वेगवेगळया पिशव्या मधुन हातभट्टी व विदेशी दारु चा माल मिळून आला आहे.
एकूण किंमत 46470/-रु.चा प्रोव्हीशन माल मिळून आला आहे.सदर चा प्रोव्हीजन माल व आरोपी असे मा.सहायक पोलीस अधीक्षक पंढरपूर यांचे आदेशाने पुढील कार्यावाही करीता पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील ताब्यात दिला असून पुढील कार्यवाहीसाठी पोलीस तपास करीत आहे.