पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांना भरभरून मदत करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही!
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै पंढरी नगरी न्युज ) : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या विकास कामासाठी आमदार समाधान आवताडे यांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू देणार नाही त्यांना शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी व मतदार संघातील सर्व कामे मार्गी लावण्यासाठी येत्या काळात खंबीरपणे साथ देणार असल्याची माहिती राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली.
मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित २४ गावातील उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावावरील सर्व नियमांची पूर्तता पूर्ण झाली आहे. या योजनेच्या प्रस्तावातील अंदाजपत्रक हे जुन्या दरानुसार असल्याने सध्याच्या दराचा आणि त्याचा ताळमेळ लागत नसल्याने ते परवडणारे नाही त्यामुळे नवीन अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असून नवीन अंदाजपत्रक येतात या योजनेस निधी देऊन योजना सुरू करण्याचे आदेश देण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली .मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथील अवताडे शुगर अँड डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या प्रथम गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी शेतकरी मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते.
यावेळी कार्यक्रमास माढा लोकसभेचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर .सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर महाराज माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील .आमदार समाधान आवताडे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील .आमदार सुभाष देशमुख. विधान परिषदेचे सदस्य रणजीत सिंह मोहिते पाटील. माळशिरसचे आमदार राम सातपुते .सोलापूर विधानपरिषदेचे माजी सदस्य प्रशांत परिचारक .माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे. मोहोळचे इंद्रजीत पवार नवनाथ पवार .शशिकांत चव्हाण .अवताडे शुगरचे चेअरमन संजय अवताडे कार्यकारी संचालक मोहन पीसी मुख्य कार्यकारी अधिकारी कोर्मदास चटके इत्यादी उपस्थित होते.
यावेळी आमदार समाधान आवताडे आपल्या प्रस्ताविकात म्हणाले की मुख्यमंत्र्यांनाही नंदुरचा कारखाना सद्यस्थितीत चालू होता असून त्यातून अनेकांचे प्रपंच चालू होणार आहेत .तीन महिन्यात ६०० कोटीचा निधी मंगळवेढा मतदारसंघासाठी खेचून आणला आहे. ७१८कोटीच्या मंगळवेढा उपसा योजनेच्या पूर्णत्वासाठी उपमुख्यमंत्री यांचा पाठपुरावा सुरू आहे. त्याचबरोबर मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर संत चोखोबा स्मारक .भीमा नदीच्या पत्रात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे गादेगाव, निंबोणी येथील ग्रामीण रुग्णालय उभारणे .पोट साठवण तलावाचा प्रश्न. मान नदीला कालव्याचा दर्जा देणे .इत्यादी मतदारसंघातील प्रलंबित कामाच्या मागण्या त्यांनी आवर्जून मंत्री महोदय यांच्यासमोर मांडल्या.
कार्यक्रमास संत दामाजी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष विष्णुपंत अवताडे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सोमनाथ अवताडे. विनायक यादव. मोहोळचे विजयराज डोंगरे .अंबादास कुलकर्णी. ज्ञानेश्वर बळवंतराव प्रदीप खांडेकर. सुरेश भाकरे. भारत निकम .सचिन शिवशरण सुहास पवार यांच्यासह तालुक्यातील शेतकरी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. तर आभार बापू मिटकरी यांनी मांडले.