विठ्ठलचे,चेअरमन अभिजित पाटलांना पडू लागली आमदारकीचे स्वप्ने 'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय'एका कार्यक्रमात गाण्यावर धरला होता ठेका!
------------------------------------------------------------------------------------
आभिजीत (आबा) पाटील इतक्या लवकर गरबड नको कार्यकत्यामधून जोरदार चर्चा
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : संध्या पंढरपूर येथील वेणूनगर विठ्ठल सहकारी साखर कारखाण्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी एका कार्यक्रमात 'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय' या गाण्यावर ठेका धरला.विठ्ठल कारखान्यातील निवडणुकीनंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी ते इच्छूक आहेत. त्या दृष्टीने विविध पक्षांकडून त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी चढाओढ सुरू आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अभिजीत पाटील हे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील यशानंतर त्यांनी पंढरपूर विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. त्यातच 'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय' या गाण्यावर केलेला डान्सची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंढरपूर येथे झालेल्या फेसबुक मित्र संमलेनात कार्यक्रमात अभिजित पाटील सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर पाटील यांनी गाण्यांवर डान्स केला. त्यांचा मला आमदार झाल्यासारखं वाटतंय या गाण्यावरील ठेका आणि आमदारकीसाठी इच्छूक यामुळे त्याची चर्चा पंढरपूर मतदारसंघाबरोबरच सोलापूर जिल्ह्यात होताना दिसत आहे.
दरम्यान, विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानंतर अभिजित पाटील यांच्या कारखान्यावर आणि पतसंस्थेवर प्राप्तीकर विभागाचा छापा पडला होता. त्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी तातडीने पंढरपूर धाव घेत अभिजित पाटील यांची भेट घेतली हेाती. तसेच, पाटील हे लवकरच भाजपमधील दिसतील, असे म्हटले हेाते.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा माढ्यात कार्यक्रमात होता. त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर पहिल्या रांगेत अभिजीत पाटील हजर होते. व्यासपीठावर असताना त्यांनी पवार यांच्याशी चर्चा केली हेाती. त्यानंतर पवारांनी त्यांना यवतपर्यंत आपल्या गाडीतून नेले हेाते. त्यामुळे अभिजीत पाटील हे राष्ट्रवादीचे पंढरपूरचे उमेदवार असणार अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यासोबत विठ्ठल कारखान्यावर एकत्र भोजन घेतले हेाते. त्यामुळे पाटील हे पंढरपूरमधून उमेदवार असणार हे पक्कं आहे. मात्र, कोणत्या पक्षाकडून याच्या उत्तरासाठी निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.