दामाजी साखर कारखान्याचे दि. ३१ डिसेंबर २०२२ अखेरचे ऊस बिल रु.२३००/- प्रमाणे शेतक-यांच्या खात्यावर जमा..चेअरमन- शिवानंद पाटील
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा ( दै. पंढरी नगरी न्युज) : मंगळवेढे येथील संत दामाजी साखर कारखान्याच्या हंगाम २०२२-२३ करिता गळीतास आलेल्या ऊसाचे दिनांक १६/१२/२०२२ ते ३१/१२/२०२२ अखेर कालावधीचे अँडव्हान्स ऊसबिल रुपये २३००/- प्रमाणे सभासद-शेतक-यांचे मागणीप्रमाणे व त्यांचे सोयीनुसार संबंधीत बँकां/ पतसंस्थेमध्ये वर्ग केले असुन कारखान्याचे शेती विभागातील कर्मचायांनी दिलेली ऊस बिलाची पावती (व्हावचर) घेवुन आपले ऊसबिलाची रक्कम बँकेतुन घ्यावी असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी केले आहे.
धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा व त्यांचे विविध शाखामध्ये कार्यक्षेत्रातील व गेटकेन ऊसाचे बिल, जिजामाता महिला नागरी बि.शेती सह.पतसंस्था, रतनचंद शहा सह.बँक,मंगळवेढा, बँक आफ इंडिया शाखा मंगळवेढा, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा मंगळवेढा इत्यादी बँका/पतसंस्था मध्ये संबंधीत शेतक-यांचे मागणीनुसार खात्यावर वर्ग केले असलेची माहिती कार्यकारी संचालक .सुनिल दळवी यांनी दिली.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री.तानाजी खरात, संचालक मंडळातील सर्व सहकारी, शेतकरी- सभासद, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी व कामगाराच्या सहकार्याने आज अखेर ९५ दिवसात ३,२८,२९० मे.टन ऊसाचे गाळप करुन ३,३९,७५० क्विंटल पोती साखरेचे उत्पादन केलेले आहे. कारखान्यावर सभासद व कामगारांची निष्ठा असल्यामुळे गाळप हंगाम चांगल्या प्रकारे सुरु असुन सरासरी साखर उतारा १०.३६ मिळालेला आहे. कारखान्याने ३१ डिसेंबर २०२२ अखेर गळीतास आलेल्या ऊसासाठी प्र.मे.टन रु.२३००/- प्रमाणे अडव्हान्स बिल व ऊस तोडणी वाहतुक ठेकेदारांची बिले पुर्णपणे अदा केलेली आहेत. हंगाम संपेपर्यंत गळीतास येणाऱ्या ऊसाचे बिल वेळेत देणेसाठी आमचे संचालक मंडळ वचनबध्द् आहे. साखर कारखानदारीत वाढत जाणाऱ्या स्पर्धेत टिकुन ऊसाला जादा दर देणेसाठी सहप्रकल्प म्हणुन आपण डिस्टीलरी प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्नशिल आहोत. त्यासाठीचा आवशक प्रस्ताव शासनदरबारी सादर केलेला आहे. लवकरच डिस्टीलरी कार्यान्वीत करणेचे संचालक मंडळाचे धोरण आहे. तरी मंगळवेढा तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक सभासद-शेतकरी यांनी आपला ऊस दामाजी साखर कारखान्याचे गळीतास पाठवुन कारखान्याचे प्रगतीसाठी सहकार्य करावे असे आवाहन चेरअमन श्री शिवानंद पाटील यांनी केले.
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री.तानाजी खरात, संचालक श्री.पी.बी.पाटील, औदुंबर वाडदेकर, राजेंद्र चरणु पाटील, भारत बेदरे, बसवराज पाटील, गौरीशंकर बुरकुल, मुरलीधर दत्तू, भिवा दोलतडे, महादेव लुगडे, गोपाळ भगरे, दयानंद सोनगे, गौडाप्पा बिराजदार,दिगंबर भाकरे, रेवणसिध्द् लिगाडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर उपस्थित होते.