सिद्देवाडी जि.प.प्रा.केंद्र शाळा, जाधव-नागणेवस्ती शाळेत सावित्रीबाई फुले जयंती,

सिद्देवाडी जि.प.प्रा.केंद्र शाळा, जाधव-नागणेवस्ती शाळेत सावित्रीबाई फुले जयंती,

------------------------------------------------------------------------------------
माता पालक गटाची बैठक, परिसर भेट आणि वनभोजन उत्साहात संपन्न.
------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै पंढरी नगरी न्यूज ) : पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी केंद्र ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधव- नागणे वस्ती शाळा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन उपाध्यक्षा . सुप्रियाताई धुरुपे,. सुजाता शिंदे,  भाग्यश्री जाधव,  मोरे आणि कांबळे-घोडके मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक .एम बी जाधव, धनाजी जाधव गुरूजी, नंदू आवताडे आणि ज्ञानेश्वर आसबे उपस्थित होते.
      
यानिमित्त काही विद्यार्थ्यांनी यथोचित भाषणे केली. यानंतर शाळेत FLN - निपुण भारत अंतर्गत माता पालक गटाची बैठक घेतली. यामध्ये प्रामुख्याने बालकांच्या शिक्षणात मातांचा सहभाग वाढवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे नियोजन केले. आज आपल्या शाळेसह तावशी परिसरातील सर्व शाळांनी परिसर भेट अंतर्गत माण नदी काठावरील बिंडाप्पा या तीर्थक्षेत्राला भेट दिली. तेथे प्रतिमापूजन आणि देवाची पूजा तावशीचे सरपंच गणपत यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध शाळांतील निवडक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. पूजन चालू असताना जमलेल्या पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी "हर हर शंभो " या गाण्यावर टाळ्या वाजवत एकच ठेका धरला.
      
दुपारी एक वाजता सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित वनभोजनाचा आस्वाद घेतला. मुलांना भरपूर भरपूर प्रमाणात चिवडा व केळीवाटपाचे नियोजन केले होते. भोजनानंतर मुलांनी नदीपात्रात विविध खेळ आणि गाण्याच्या तालावर नाचत धमाल केली. कोल्हापूर पद्धतीच्या जवळपास साठ दारे असणाऱ्या मोठ्या बंधाऱ्याची माहिती मुख्याध्यापक विठ्ठल शिखरे आणि अप्पा मोरे यांनी दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी याठिकाणी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. पवार सर, तात्या यादव, देवळे सर, आसबे सर, दादा इंगोले, विष्णूपंत गावडे, कुमार पाटील, पाराध्ये सर, हेंबाडे सर, बनसोडे सर, यादव मॅडम,इ.उपस्थित होते. अंगणवाडी कर्मचारी यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.