श्री पांडुरंग कारखान्याकडून निडवा उसास १००रुपये प्रमाणे अनुदान देणार- चेअरमन प्रशांतराव परिचारक यांची माहिती...

श्री पांडुरंग कारखान्याकडून निडवा उसास १००रुपये प्रमाणे अनुदान देणार- चेअरमन प्रशांतराव परिचारक यांची माहिती...

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) : श्रीपुर येथील श्री .पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपास येणाऱ्या सभासदांच्या मिळवा उसास प्रति मे टन १०० रुपये प्रमाणे ज्यादा अनुदान देणार असल्याची माहिती कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली.

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे पुढील गणित हंगाम २०२३-२४ मध्ये विस्तारीकरण होणार असून हा गळीत हंगाम सुमारे ९ हजार ५००  प्रतिदिन गाळप क्षमतेने चालणार आहे, गळीत हंगाम २०२३-२४ साठी कारखान्याकडे सुमारे ११ लाख मे टन उसाच्या नोंदी झालेल्या असून आणखी ऊस लागवडी चालू आहेत त्यामुळे साधारणपणे कारखान्याकडे १२ लाख मे टन उसाची उपलब्ध होईल अशी शक्यता आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हा या गाळप हंगामातील खोडवा ऊस तुटून आल्यानंतर मिळवा म्हणजे तिसऱ्या पिकाचा ऊस ठेवल्यास सभासदांना त्यांना प्रतिमेत्रिक टन १०० रुपये जादा अनुदान निघणाऱ्या उसास दरा व्यतिरिक्त देणार आहेत मिळवा ऊस पिकासाठी येणाऱ्या खर्चामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात बचत होते त्याप्रमाणे मेहनत देणे लागण याचाही खर्च कमी होऊन कमी कालावधीत जास्तीचे उत्पन्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळते त्याचप्रमाणे पूर्वमशागतीवरील खर्च वेळ व श्रमाची बचत होते जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निडवा व पीक ठेवावे असे आवाहन करण्यात आले.

यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी बोलताना म्हणाले की ,ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये मिळवा ऊस पिकाद्वारे जास्तीचे उत्पन्न मिळणार आहे निडवा उसास लागणारी रासायनिक व जिवाणू खते उधारीवर कारखान्यामार्फत दिली जाणार आहेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निडवा पीक ठेवून उत्पादन वाढवावे निडवा ऊस पीक ठेवणार असलेल्या बाबतची फार्म कारखान्याच्या शेती विभागाकडे भरून द्यावेत असे आवाहन करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीप चव्हाण, हरीश दादा गायकवाड, ज्ञानदेव ढोबळे ,तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमार भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे ,भास्कर कसगावडे ,भैरू वाघमारे ,गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव ,हनुमंत कदम, किसन सरवदे ,शामराव साळुंखे ,राणू पाटील इत्यादी अधिकारी उपस्थित होते.