महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याचा खेडभोसे ग्रामस्थांनी केला सन्मान
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) नुकताच महाराष्ट्र केसरी किताब मिळविलेले पैलवान सिकंदर शेख हे पहिल्यांदाच खेडभोसे गावामध्ये आले होते. महाराष्ट्र केसरी किताब मिळवल्याबद्दल खेडभोसे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

खेडभोसे (ता. पंढरपूर) हे पैलवानांचे गाव म्हणून ओळखले जाते. गावामध्ये अनेक पैलवान तयार होत आहेत. या उदयोन्मुख पैलवानांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सिकंदर शेख यांनी खेडभोसे गावाला रविवारी सकाळी भेट दिली. यावेळी खेडभोसे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायट्यांचे आजी माजी चेअरमन, संचालक, युवा पैलवान यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.