पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने माझी चित्रवारी विशेष छायाचित्र स्पर्धेचे आयोजन ◼️ माझी चित्रवारी स्पर्धेत सहभाग नोंदवा आणि बंपर बक्षिसे मिळवा :- मुख्य अधिकारी महेश रोकडे

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने माझी चित्रवारी विशेष छायाचित्र स्पर्धेचे आयोजन  ◼️ माझी चित्रवारी स्पर्धेत सहभाग नोंदवा आणि बंपर बक्षिसे मिळवा :- मुख्य अधिकारी  महेश रोकडे

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) येथील पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी दि .25 येणाऱ्या आषाढी एकादशी सोहळासाठी मोठ्या उत्साहाने विविध संतांच्या पालखी दाखल होणार आहेत त्यानिमित्त पंढरपूर नगर परिषदेने माझी चित्रवारी या विशेष छाया चित्र स्पर्धेचे मोफत आयोजन केले असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी महेश कोकडे यांनी दिली आहे.

या भव्य छायाचित्र स्पर्धेत पंढरपूर शहरातील नागरिकांनी आषाढी वारी सोहळ्यातील संबंधित छायाचित्रे काढूने गरजेचे असून नगरपरिषद पंढरपूर कार्यालयाशी पाठवा व विशेष बक्षीसे मिळवा ही स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील माझी चित्रवारी विशेष छायाचित्र स्पर्धेचा कालावधी 17 जुलै ते 26 जुलै पर्यंत राहील तरी पंढरपूर शहरातील नागरिकांनी मोठ्या उस्फूर्तपणे भाग घ्यावा आपली नावे पंढरपूर नगरपरिषद येथे नोंदवावी असे आवाहन मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी केले .