पंढरपूरचे नूतन तहसीलदार सचिन लंगोटे तहसीलदार पदाचा पदभार आज स्वीकारणार
--------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूरचे तत्कालीन तहसीलदार सुशील बेलेकर यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त ठिकाणी नूतन तहसीलदार म्हणून सचिन लंगोटे हे आज शनिवार दि. ३ रोजी सायंकाळी ५. वाजता पंढरपूर येथील तहसीलदार कार्यालयाचा पदभार स्वीकारणार आहेत .सचिन लंगोटे यांनी या अगोदर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, आटपाडी, व इंदापूर येथे शेती महामंडळ येथील तहसीलदार पदावर काम करीत असताना शेती महामंडळातील शेतकऱ्यांची अनेक कामे मोठ्या प्रमाणात निकाली काढल्याने त्यांची माळशिरस तालुक्यात उत्कृष्ट काम केल्याची चर्चा सतत होत होती.
महसूल विभागात ९ वर्षे सेवेत असताना त्या - त्या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी केली आहे . नूतन तहसिलदार सचिन लंगोटे हे शिस्तप्रिय तहसीलदार म्हणूनही त्यांनी आपल्या नावाचा ठसा कामातून दाखविला आहे. नूतन तहसीलदार सचिन लंगोटे हे आज शनिवार रोजी पंढरपूर येथील तहसील कार्यालयात येवून आपला पदभार घेणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी तहसील कार्यालयातील अधिकारी, खते प्रमुख, महसूल विभागातील कर्मचारी सज्ज असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली.