आषाढी यात्रेच्या पार्श्वभुमीवर सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांची शहरातील अवैध दारू साठा करणारे इसमांवर कारवाई "

आषाढी  यात्रेच्या  पार्श्वभुमीवर सहाय्यक पोलीस अधिक्षक  प्रशांत डगळे यांची  शहरातील अवैध दारू साठा करणारे इसमांवर कारवाई "

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज )दि. १७ रोजी प्रशांत डगळे सहाय्यक पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांना मिळालेल्या बातमीनुसार पंढरपूर शहरातील इसवावी भागातील जुने गावठाण भागात काही इसम अवैधपणे देशी दारूचा साठा करत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने प्रशांत डगळे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांच्या कार्यालयाकडील पोलीस पथकाने पंढरपूर शहरातील इसवावी भागात बातमीतील ठिकाणी गेले असता, एक पत्र्याचे खोलीला कुलूप लावल्याचे व घरासमोर एक संशयीत इसम दिसला असता, त्याचेकडे जावून चौकशी केली असता, सदरचे घर त्याचेच असल्याचे सांगितले. सदर घराचे कुलूप काढले असता, घरात देशी दारू टॅगो पंच कंपनीचे बॉक्स असलेचे दिसून आले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता, सतिश वासुदेव मलपे वय ५० वर्षे, रा. जुने गावठाण, इसबावी पंढरपूर असल्याचे सांगितले. सदरचा प्रोव्ही मालाबाबत अधिक चौकशी केली असता, त्याचा मुलगा भागेश सतिश मलपे वय २३ वर्षे, रा. जुने गावठाण इसवावी, पंढरपूर याने साठा केल्याचे सांगितले. तसेच सदरची खोली असलेले घर त्याचे आणि भाऊ अजितकुमार वासुदेव मलपे वय ४२ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. जुने गावठाण, इसवावी, पंढरपूर असे दोघांचे सामाईक असलेचे सांगितले. तरी दि. १७/०७/२०२६ रोजी २०:३० वा. पंढरपूर शहरातील इसवावी भागातील जुने गावठाण येथे आरोपी नामे १) भागेश सतिश मलपे २) सतिश वासुदेव मलपे ३) अजितकुमार वासुदेव मलपे यांनी आपले कब्जात ७६,८००/- रू. किंमतीच्या देशी दारू टॅगो पंच कंपनीचे एकुण सिलबंद २० बॉक्स विनापरवाना व बेकायदेशीर बाळगलेल्या अवस्थेत मिळून आले आहेत. म्हणुन पोकॉ/१४२३ राहुल लोंढे यांनी वरील इसमांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.

 प्रशांत डगळे , सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेला आवाहन केले आहे की, आषाढी वारी सोहळा २०२६ मोठया उत्साहात पार पाडण्याकरीता आपण सर्वांनी सहकार्य करून आपल्या गावामध्ये अशा प्रकारचे अवैध धंदे चालु असल्यास आम्हास संपर्क करावा व यात्रा कालावधीत अथवा यापुढे कोणी अशा प्रकारचे बेकादेशीर कृत्य अथवा अवैध धंदे सुरू ठेवील अशा समाजविघातक लोकांवर प्रचलित कायदयानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल. तसेच अशा लोकांची यापुढे गय केली जाणार नाही असे सांगितले आहे.

सदरची कारवाई प्रशांत डगळे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/१८६ निलेश रोंगे, मपोहेकॉ/१८७६ शितल राऊत, पोकॉ/८०४ दिगंबर भंडारवाड, पोकॉ/१४२३ राहुल लोंढे यांनी पार पाडलेली आहे.