गावात शाश्वत स्वच्छतेसाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे गट विकास अधिकारी शिवाजीराव पाटील.

गावात शाश्वत स्वच्छतेसाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे गट विकास अधिकारी शिवाजीराव पाटील.

---------------------------------------------------------------------------
मंगळवेढा( पंढरी नगरी न्यूज ):-
प्रत्येक गावात सर्व ग्रामस्थांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी गावात शाश्वत स्वच्छता ठेवणे हे अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून स्वच्छतेसाठी श्रमदान यासारख्या उपक्रमांमध्ये गावातील सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन मंगळवेढा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शिवाजीराव पाटील यांनी केले.
स्वच्छता ही सेवा २०२३ या उपक्रमांर्तगत रविवार १ आॕक्टोंबर २०२३ रोजी पंचायत समिती व ग्रामपंचायत ब्रम्हपूरी येथे १ तारीख १ तास या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छतेसाठी श्रमदान या कार्यक्रमामध्ये गट विकास अधिकारी शिवाजीराव पाटील हे बोलत होते.यावेळी माजी सरपंच पुजारी दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक राजन पाटील , सोयायटीचे माजी चेअरमन सज्जन पाटील , माजी सैनिक माणिकराव कोळी , अशोक मोरे , बाळकृष्ण मोरे , विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सांळुंखे , हरिदास नरळे , जिल्हा कक्षमधील सचिन सोनवणे , बी.आर.सी.धर्मराज संखनवरु ,सी.आर.सी.एकनाथ जगताप ,ग्रामसेवक संजय शिंदे , माजी सदस्य, विक्रम पाटील , मनोज जगताप यांचेसह जि.प.प्रा.शाळा मुख्याध्यापक , शिक्षक , अंगणवाडी सेविका, मदतनीस , आशा वर्कर, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायतीचा परिसर ,शाळा , अंगणवाडी , आरोग्य वर्धिनी उपकेंद्र सर्व अधिकारी , कर्मचारी , ग्रामपंचायतचे पदाधिकारी ,शिक्षक , अंगणवाडी सेविका, मदतनीस , आशा वर्कर,ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी ग्रामपंचायतीचा परिसर स्वच्छतेसाठी श्रमदान करुन स्वच्छ व सुंदर केला.यावेळी स्वच्छता ही सेवा शपथ कार्यक्रम, जलसुरक्षक , ग्राम पाणी गुणवत्ता तपासणी तसेच ग्राम पाणी व स्वच्छता समिती सदस्य यांना गट विकास अधिकारी पाटील यांच्या हस्ते बॕचेस प्रदान करण्यात आले.
×××××××××××××××××××××××××××××××××××××××
स्वच्छता ही सेवा २०२३ या उपक्रमांर्तगत स्वच्छतेसाठी एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
स्वच्छता ही सेवा शपथ कार्यक्रम
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
जलसुरक्षक , ग्राम पाणी गुणवत्ता तपासणी तसेच ग्राम पाणी व स्वच्छता समिती सदस्य यांना बॕचेस प्रदान.