पंढरपूर तालुका पोलीस ठाणेची गुरसाळे हद्दीत धडक कारवाई ◼️ अवैध जुगार अड्डयावर धाड ०२ लाख, ५४ हजार, १७० रूपयांचा मुद्देमाल जप्त. संशयित आरोपीवर कडक कारवाई
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२५ चे पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक . अतुल कुलकर्णी , अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर प्रशात डगळे या यांनी अवैध धंदयांवर कारवाई करणेबाबत दिलेल्या सुचना व आदेशानुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे हद्दीत मौजे गुरसाळे, ता. पंढरपूर गावातील भीमा नदी बंधा-याकडे जाणारे रोडचे बाजुला आडोशाला झाडाखाली काही इसम गोलाकार बसुन ५२ पानी पत्त्याचा मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे १) महेश सुरेश पवार, २) दिपक बाळु गाडे, ३) दिपक परमेश्वर रणपिसे, ४) पांडुरंग उर्फ कुंदन अशोक रणपिसे, ५) बजरंग उर्फ भज्या सुरेश पवार, ६) सुभाष रमेश पवार, सर्व रा. गुरसाळे, ता. पंढरपूर, ७) लखन उर्फ लंडन दादासाहेब वाकये, रा. पुर्नवसन टाकळी, पो. गुरसाळे, ना. पंढरपूर हे गोलाकार बसुन ५२ पानी पन्याचा मन्ना नावाचा जुगार खेळत असताना मिळुन आले. त्यांचे ताब्यात दोन मोटारसायकल, तीन मोबाईल व रोख रक्कम असा एकुण २, ५४, १७०/- (अक्षरी दोन लाख, चोपन्न हजार, एकशे सत्तर रूपये) किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असुन मिळुन आलेल्या इसमांविरूध्द् महा. जुगार प्रतिबंध अधि कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर सहायक पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर प्रशांत डगळे पोलीस निरीक्षक, पंढरपुर तालुका पोलीस ठाणे मा. टी.वाय. मुजावर यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील भारत भोसले, एस. एस. शेंडगे, सय्यद, घंटे, पोकों. ७९६ आवटे, पोर्को कदम, काळे यांनी केली आहे.