न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी येथील महाविद्यालयाचा 99.17% निकाल

न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी येथील महाविद्यालयाचा 99.17% निकाल

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा विज्ञान शाखेचा निकाल 99.17% लागलेला आहे या महाविद्यालयात अंजली भास्कर लोखंडे 83.67% व प्रगती प्रकाश शेंडे, प्रीती प्रशांत माळवदे 80% तर अमृता युवराज शिंदे 79.17% गुण मिळवून महाविद्यालयात उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी एकूण 243 विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी विष 12 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळाले आहे तर 140 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 88 द्वितीय श्रेणी ने पास झालेले आहेत.

या यशस्वी विद्यार्थ्यां,शिक्षकाचे अभिनंदन स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजी शिंदे, सरपंच रणजीत जाधव, प्राचार्य एन.एम. गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.