कोळा येथील जुगार अड्ड्यावर पोलिस प्रशासनाकडून मोठी कारवाई ◼️ सहा. पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचा पुन्हा सांगोला भागात दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राइक ◼️ १ कोटी १९ लाख १५ हजार ७७७ रू.चा मुदद्देमाल जप्त" ◼️ सांगोला पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका नागरिकांतून चर्चा
-------------------------------------------------------------------------------------
सांगोला( दै. पंढरी नगरी न्यूज ) सोलापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, यांनी मौजे कोळा ता. सांगोला जि. सोलापूर येथे अंकुश आनंदा अलदर याने त्याच्या कोळा शिवारातील शेती गट नं.१७५९ मधील शेडनेट मध्ये लोकांना जमवून विनापरवाना जुगार अड़ा चालवित अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून छापा कारवाई करणेबाबत आदेशीत करण्यात आले होते. आम्ही सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर असे सांगोला पोलीस ठाणेस दि. ०९/११/२०२५ रोजी ठाणे दैनंदिनीस नोंद ३०/२०२५ वेळ २९.१० वा.नोंद करुन आमचे सह ४ पोलीस पथकाचे सोबत मौजे कोळा ता.सांगोला जि. सोलापूर येथे दुर्गम डोंगराळ भागामध्ये जावून अंकुश अलदर याच्या जुगार अड्यावर छापा कारवाई केली आहे.
मौजे कोळा येथील शेडनेटच्या मध्ये लाकडी ६ टेबलवर गोलाकार करून जुगार खेळण्याकरीता आलेल्या इसमांकडे दुचाकी वाहने, चारचाकी वाहने, रोख रक्कम, जुगार खेळण्याकरीता वापरात आणलेली रक्कम, जवळ बाळगलेले मोबाईल, जुगार साहित्य, ५२ पानी पत्याचे डाव, पत्राशेड/शेडनेट मध्ये असलेले खुर्चा, टेबल, फिज, गॅस सिलेंडर व शेगडी इत्यादी साहीत्य जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये १) रोख रक्कम ४,१७,५७७/- २) टेबल, खुर्ष्या, जुगार खेळण्याचे साहित्य, फिज, पत्यांचे डाव असलेले बॉक्स्, इ. साहित्य व मोबाईल फोन किंमत रुपये -९,३८,२०० /- रुपये ३) ११ चारचाकी वाहने किंमत रुपये ९६,००,०००/- ४) १४ दुचाकी वाहने किंमत रुपये ९,६०,०००/- असा एकुण १,१९,१५,७७७ रुपये (अक्षरी एक कोटी एकोणीस लाख पंधरा हजार सातशे सत्याहत्तर रुपये) चा मुदद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याबाबत सांगोला पोलीस ठाणेस ४५ जुगार खेळणा-या इसमां विरुष्ट् महाराष्ट्र जुगार कायदा १८८७ कलम ३(१) ४ व ५ प्रमाणे सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नंबर ८८२/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सो, सोलापूर ग्रामीण, मा.अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगले, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोसई/अनिल पाटील, पोसई अब्दुलहमीद शेख, पोसई नितीन जगताप, पोसई महादेव पिसाळ, सपोफौ ढवळे, पोह/१८६ निलेश रोगे, पोह/८५ कामतकर, पोहेकॉ/३२० कांबळे, पोना/४२७ विनोद शिंदे पोकों/२०३६ माने, पोहेकॉ/१९० देशमुख, पोहेकॉ/१२५ साळुंखे, पोहेकॉ/१०४ शिंदे, पोहेकों/२००४ गरड, पोहेकॉ/१६३५ शेख, पोहेकॉ/१६९८ आटपाडकर, पोहेकॉ/४०४ जाधव, पोहेकों/२९१ घोडके, पोहेकों / ११८ पाटील, पोहेकों/देवकते, पोहेकों/२६ भोसले पोना/११०८ काकडे,, पोना/१४८६ नरळे पोका/२११६ सागर गवळी, पोहेकों/८१९ चौगुले, पोकों/७२ डी टिंगरे, पोकों/६२४ वैभव घायाळ, पोकों/१४९१ सुर्यवंशी व चालक पोकों/डी ५९ गोडसे यांनी पार पाडलेली आहे.