मयत झालेल्या व्यक्तीच्या वारस नोंदी आता घरबसल्या १८ दिवसात होणार :- शासनाचा निर्णय
------------------------------------------------------------------------------------
मुंबई ( पंढरी नगरी न्यूज) : शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात पण त्याच्यासाठी शेत जमिनीवर वारस नोंद करावी लागते एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्यात वारस नोंदीसाठी संबंधित गाव कामगार तलाठी यांच्याकडे अर्ज करावा लागतो त्यासाठी आता तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही राज्य सरकारने ई हक्क प्रणाली द्वारे घरबसल्या तो अर्ज करता येईल ती वारस नोंद १८ व्या दिवशी संबंधित व्यक्तीचा अर्ज व कागदपत्रे अचूक असल्यास त्याची ७/१२ वर नोंद होणार आहे.
महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी मयत वारसाची नोंद सुलभ होण्यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणाली द्वारे शेतकरी घर बसल्या सात ते आठ प्रकारचे फेरफार मिळण्यासाठी अर्ज करू शकतात ७/१२ वर उतारा बोजा चढवणे, कमी करणे, नावाची दुरुस्ती, वारस नोंदी करणे, कमी करणे अशा सर्व सेवांसाठी अर्ज करता येऊ शकतो. तलाठ्याकडील अर्जावर कार्यवाही झाल्यानंतर सतराव्या दिवशी तो मंडळ अधिकारी यांच्याकडे जातो आठराव्या दिवशी नोंद करणे किंवा रद्द होईल त्यासंबंधीचा अधिकार मंडळ अधिकाऱ्यांना आहे.
त्यासाठी मयताच्या वारसदाराने शपथ पत्र लिहून देणे गरजेचे आहे. त्यात मृत व्यक्तीच्या सर्व माणसाचे नावे पत्ते नमूद करावीत सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर फाईल अपलोड झाल्याचा मेसेज येईल त्यानंतर एक स्वयंघोषणापत्र दिसेल या पत्राखाली सहमत या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर वारस नोंदीचा अर्ज तलाठी कार्याकडे जाईल तिथे त्या अर्जाची छाननी होऊन तो मंजुरीसाठी संबंधित मंडळ अधिकारी यांच्याकडे जाईल त्यानंतर आठराव्या दिवशी ७/१२ वर वारसाची नावे लागतील असे जिल्ह्यातील जास्तीत जास्त खातेदारांना या सुलभ योजनेचा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.