मातोश्री ईश्वरामा जुनिअर कॉलेज विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन..
---------------------------------------------------------------------------------
पंढरपर( पंढरी नगरी न्यूज ) ; मातोश्री ईश्वराम्मा ज्युनिअर कॉलेज पंढरपूर या विभागाअंतर्गत असलेल्या कला, वाणिज्य, विज्ञान या विभागाचा एकूण निकाल ९८.३६% लागला असून कला शाखा ९५.९१% ,वाणिज्य ९७.१४% तर विज्ञान १००% निकाल लागला असून अशी भरघोस यशाची परंपरा राखलेबद्दल व " कला "शाखेत प्रथम. किशोर भारत घाडगे ६७.८३% द्वितीय. माधुरी प्रमोद तापसे ६७.१७% ,तृतीय. शुभम महेश मार्कंड ६६.६७% "वाणिज्य" शाखेत प्रथम अमित दगडू राऊत ७४.३९% द्वितीय ऐश्वर्या अशोक शिंदे ७२% तृतीय. सुधाकर ज्ञानेश्वर घोडके. ६९%, "विज्ञान" शाखा प्रथम. वैष्णवी संजय क्षीरसागर ८१.७६% द्वितीय. श्रावणी पंडित थिटे ७९.३३%, पल्लवी प्रमोद काळे ७९.३३% तृतीय .आकांक्षा अविनाश श्रीखंडे ७९% यांनी यश प्राप्त केल्याबद्दल संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून संस्था सचिवा सुनेत्राताई पवार यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
यावेळी संस्थेचे सल्लागार विजयसिंहजी पवार, युवक काँग्रेस आय जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, रुक्मिणी बँक चेअरमन सविता लोखंडे, प्राचार्या नंदिनी गायकवाड. यांनीही विषय शिक्षक व शिक्षिका यांचे अभिनंदन केले.