कासेगावात बेटी बचाओ, बेटी पढाओ, जनजागृती उपक्रमाचे भरगच्च आयोजन..

कासेगावात बेटी बचाओ, बेटी पढाओ, जनजागृती उपक्रमाचे भरगच्च आयोजन..

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत पंचायत समिती पंढरपूर आरोग्य विभाग व दौलतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कासेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगाव या ठिकाणी बेटी बचाओ- बेटी पढाओ जनजागृती व माता पालक सभा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
    
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ .राही संग्रामसिंह देशमुख तसेच प्रमुख उपस्थिती कासेगाव च्या सरपंच सौ .सुनंदा भुसे , सौ. राजगौरी देशमुख उपस्थित होते.
    
डॉ. एकनाथ बोधले यांनी घटत चाललेले मुलींचे प्रमाण व त्याचे दुष्परिणाम याविषयी सविस्तरपणे माहिती सांगितली. तसेच माता मृत्यू , बालमृत्यू , उपजत मृत्यू ,बेकायदेशीर गर्भपात , बालविवाहाचे तोटे याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये गावातील एका मुलीवर शस्त्रक्रिया करून घेतलेल्या जोडप्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमा मध्ये डॉक्टर तनपुरे मॅडम ,सरपंच  सुनंदा भुसे , राही देशमुख बेसुळके मॅडम ,सर्वगोड मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रशालेचे  कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक  लवटे सर , पर्यवेक्षक  फडतरे सर तसेच श्रीमती.तारळेकर मॅडम,. तोरणे मॅडम , पल्लवी जाधव मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.