सिताराम महाराज साखर कारखान्याचा शुक्रवार दि. १४ रोजी मोळी पूजनाचा शुभारंभ

सिताराम महाराज साखर कारखान्याचा शुक्रवार दि. १४ रोजी मोळी पूजनाचा शुभारंभ

----------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (प्रतिनिधी):- खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याचा सन २०२२-२३ या सिझन चा १२ गळीत हंगाम शुभारंभ शुक्रवार दि. १४ रोजी गव्हाणीत मोळी टाकून करणार असल्याची माहिती कारखान्याचे मुख्य प्रवर्तक  शिवाजीराव काळुंगे सर यांनी दिली.

यावेळी सदर कार्यक्रमास ह. भ .प .जयवंत बोधले महाराज धामणगावकर व ऊस उत्पादक शेतकरी सिद्धनाथ जगदाळे. शिवाजी घोडके. दत्तात्रेय सावंत. धुळा पाटील. चांगदेव पवार यांच्या शुभहस्ते तसेच सोलापुर येथील मनोरमा सहकारी बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११:३० वा. कारखाना कार्यस्थळावर कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमास विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे. सांगोला तालुका सहकारी सूतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे. मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील. व्हाईस चेअरमन तानाजी खरात. राजेवाडी येथील सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन एन शेषगिरी राव .जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन राजेंद्र हजारे. सांगोला येथील उद्योजक सोमनाथ गुळमिरे. सिताराम महाराज साखर कारखान्याच्या चेअरमन शोभा काळुंगे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी  गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने होणार असून.

यासाठी पंढरपूर - सांगोला - मंगळवेढा येथील ऊस उत्पादक शेतकरी, वाहन मालक, कर्मचारी , खाते प्रमुख, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे जनरल मॅनेजर हनुमंतराव पाटील यांनी केले.