गोपाळपूर येथील श्रीकृष्ण सार्वजनिक वाचनालयात बालकुमार ज्ञानअंकुर कोपरा चे उद्घाटन..
-----------------------------------------------------------------------------------*
पंढरपूर(पंढरी नगरी न्यूज ) : तालुक्यातील गोपाळपूर येथील श्रीकृष्ण सार्वजनिक वाचनालयामध्ये बालकुमार ज्ञान कोपरा चे उद्घाटन जिल्हा ग्रंथालय संघाचे सहसचिव अन्सार शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रामदास नागटिळक, ग्रंथालयाचे अध्यक्ष बापू पडवळे, तानाजी जाधव, निकम सर, ग्रंथपाल प्रशांत जाधव, दरलींग शिखरे व बाल वाचक उपस्थित होते. यावेळी बालकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शासनाच्या आदेशानुसार येथे बालकुमार ज्ञान कोपराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे आणि वाचनाची आवड निर्माण होण्याची गरज असल्याचे सांगून बालकांनी नियमीत या ज्ञानकोपऱ्या उपक्रम योजने ब सून वाचन करण्याचे आवाहन करण्यात आले .यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रमास लहान थोर वाचक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .आभार संस्थेचे अध्यक्ष बापू पडवळे यांनी व्यक्त केले.