पंढरपुरात मराठा आरक्षणास वाढता पाठिंबा; हिंदू खाटीक समाजाचा मराठा आरक्षणास जाहीर पाठींबा
****************************************************
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) मराठा आरक्षणासाठी पंढरपूर येथे गणेश जाधव हे दि.०८-०९-२०२३ पासून उपोषणाला बसले आहेत, त्यांच्या उपोषणाला व मराठा आरक्षणाला पंढरपूर येथील हिंदू खाटीक समाजाने एकत्र येऊन सह्यांची मोहिम हाती घेत, उपोषण स्थळी जाऊन जाहीर पाठींबा दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या मराठा आरक्षणास्तव चालू असलेल्या उपोषण आंदोलनात पंढरपूर येथून गणेश जाधव यांनी सहभाग नोंदवित, सक्रिय आंदोलनात मराठा आरक्षणासाठी उडी घेतली आहे. या आंदोलनाला विविध समाज घटकांकडून पाठींबा दर्शविला जात आहे. पंढरपूर येथील हिंदू खाटीक समाजातील ५०-६० तरूणांनी एकत्र येऊन सह्यांची मोहिम हाती घेत, मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. तशा आशयाचे पत्र गणेश जाधव यांना हिंदू खाटीक समाजातील ५०-६० तरुणांनी एकत्र येत दिले आहे.