सत्यसाई सेवा संघटना केंद्र, मुंबई तर्फे पंढरीतील वारकरी भक्तांना मोफत औषधोपचार व आरोग्य तपासणी

सत्यसाई सेवा संघटना केंद्र, मुंबई तर्फे पंढरीतील वारकरी भक्तांना मोफत औषधोपचार व आरोग्य तपासणी

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) : मानव सेवा हीच माधव सेवा या उदात्त हेतूने प्रेरित होऊन पंढरीच्या पुण्यभूमीत श्री. सत्य साई सेवा संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई केंद्र पंढरपूर यांचे वतीने आषाढी एकादशी निमित्त पंढरीतील वारकरी भक्तांसाठी यात्रा कालावधीत मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार सेवा देण्यात आली या सेवेचा 19807 वारकरी भक्तांनी या मोफत उपचाराचा लाभ घेतला.

यामध्ये प्रत्येक वर्षी या संस्थेच्या वतीने आषाढी, कार्तिकी ,माघी व चैत्री वारीमध्ये ही सेवा मोफत देण्याचे कार्य ही संस्था करते. सदरची सेवा 65 एकर, शेगाव दुमाला ,रेल्वे स्टेशन, के बी पी चौक, कोर्टी रोड, नवीन कराड नाका , कासेगाव चौक व गोपाळपूर येथे देण्यात येते.

यामध्ये डॉ.शरद शिर्के, डॉ. धवल पांडिया,डॉ. शुभांगी गाडे, डॉ.हर्षना शाह, डॉ. रेणू ,डॉ. दीपा परब, डॉ. जडाल, डॉ. कळके व २५ सेवादारी साईभक्तांनी ही सेवा पूर्ण केल्याबद्दल यांचे पंढरपुरातून या सेवेचे वारकऱ्यांमधून समाधान व कौतुक होत आहे.

या सत्यसाई केंद्रामार्फत गरोदर महिलांना, पालवी संस्था ,शैक्षणिक संस्था वारकरी,यांनाही वर्षभर मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार देण्याचे कार्य ही संस्था कायमस्वरूपी करत असते ..