सिताराम महाराज साखर कारखाना यंदा ५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार :- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी गायकवाड

सिताराम महाराज साखर कारखाना यंदा ५  लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार :- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी गायकवाड

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) : पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्यात रोलर पूजन कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी गायकवाड म्हणाल्या की यंदा हंगामात सिताराम महाराज साखर कारखाना यंदा  ५ लाख मीटर टन उसाचे उद्दिष्ट असून दररोज कारखाना साधारणपणे ३६०० मेट्रिक टन ऊस गाळप करेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच नोंद झालेल्या सर्व उसाचे नियोजनबद्ध गाळप केले जाणार आहे. त्यासाठी ऊस तोडणी वाहतूक करार करण्यात येत आहेत असे मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी केले. बुधवार दिनांक ५/७/२०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता ह.भ. प. डॉ. जयवंत बोधले महाराज धामणगावकर यांच्या शुभहस्ते रोलर पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमास कारखान्याचे मुख्य प्रवर्तक प्राध्यापक शिवाजीराव काळंगे, कारखान्याच्या चेअरमन शोभाताई काळुंगे, संचालक महादेव देठे( सावकार), वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव, खर्डी येथील प्रगतशील बागायतदार बिभीषण ताड, संचालक दिपाली पाटील, स्नेहलता मुदगुल, अँडवोकेट श्रीशैल हावनाळे हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना ह .भ. प .जयवंतराव बोधले महाराज यांनी सांगितले की, समर्पक वृत्तीने कोणतेही कार्य केले की यश प्राप्त होती सिताराम महाराज साखर कारखान्याचे व्यवस्थापन व कर्मचारी यांनी एकजुटीने काम करीत असल्याने यश प्राप्त झाल्याचे नमूद केले. कारखान्याचे संचालक महादेव देठे म्हणाले की उत्तम पद्धतीने कर्मचारी काम केल्यास गाळपास कोणती अडचण येणार नाही तसेच जिल्ह्यामध्ये दोन-तीन वर्षांमध्येच सिताराम महाराज कारखान्याचे नाव पहिल्या पाच क्रमांकामध्ये येत असल्याबाबतचा अभिमान असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, कारखान्याच्या चेअरमन शोभाताई काळुंगे यांची भाषणे झाली. यावेळी कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या मुलांनी दहावी बारावी मध्ये चांगल्या गुणांनी यश मिळवल्याबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह   देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास टेक्निकल जनरल मॅनेजर सूर्यकांत पाटील ,प्रशासन अधिकारी डी .एम सुतार, चीप चीप केमिस्ट व्ही .एस नागणे, कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी पी.जी. शिंदे, मल्टीस्टेटचे जनरल मॅनेजर फडतरे, विविध खात्याचे प्रमुख उपस्थित होते .कार्यक्रमास वाहन मालक ,तोडणी  मालक, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .कार्यक्रमाचे आभार कारखान्याचे संचालक सुयोग गायकवाड यांनी आभार मानले.