माय फर्स्ट प्रशालेत उद्या दि. २६ रोजी विविध कला गुणदर्शन कलाविष्काराचे आयोजन..

माय फर्स्ट प्रशालेत  उद्या दि. २६ रोजी विविध कला गुणदर्शन कलाविष्काराचे आयोजन..

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर पंढरी नगरी न्यूज : पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील माय फर्स्ट स्कूल या विद्यालयात रविवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सायं.६ वाजता विद्यालयातील विद्यार्थी यांच्यात असणारी कलागुण व नृत्यविस्कार यांना चालना देण्यासाठी कलाविष्काराचे भव्य -दिव्य आयोजन करण्यात आले ,असल्याची माहिती विद्यालय नियोजन कमिटीच्या वतीने देण्यात आली .

या कलाविष्कार कार्यक्रमाचे उद्घाटन लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत च्या सरपंच विजयमाला वाळके ,उपसरपंच संजय साठे यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमास गादेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा शिवरत्न ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव मोरे, सिल्वर ओक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आष्टी- प्राचार्य विनोद कदम, ग्रामपंचायतीच्या सदस्या रूपाली सागर कारंडे ,लक्ष्मी बहुउद्देशीय व सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा ज्योती सुर्वे ,प्रगतशील बागायतदार संतोष माने ,उद्योजक भारत कदम इत्यादी मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थित राहणार आहेत .

तरी प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या भव्य -दिव्य होत असलेल्या विविध कला गुणदर्शन कार्यक्रमास पंढरपूर शहर व टाकळी पंचक्रोशीतील पालक बंधू-भगिनी व नाट्यप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात येत आहे .कार्यक्रमाचे ठिकाण प्रशालेचे पटांगण हनुमान नगर टाकळी रोड पंढरपूर येथे हा कार्यक्रम होणार आहे.