अनवली येथे डेंग्यूचे थैमान डेंग्यूने घेतला एका महिलेचा जीव; गावात भीतीचे वातावरण

अनवली येथे डेंग्यूचे थैमान डेंग्यूने घेतला एका महिलेचा जीव; गावात भीतीचे वातावरण

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) तालुक्यातील अनवली येथे डेंगूणे या साथीच्या रोगाने सध्या थैमान घातले असून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव ज्योती सुनील पवार( वय २६) या महिलेचा पहिला बळी गेला आहे .अनवली येथील ज्योती पवार यांना उपचाराकरता पंढरपूर येथील नवीन कराड नाक्या वरील लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवार दिनांक १५ रोजी सायंकाळी दाखल करण्यात आले होते. डेंगू च्या आजारामुळे त्यांच्या शरीरातील पेशीचे प्रमाण देखील कमी झाले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांचा काही तासाने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

सध्या पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये रुग्णांच्या शरीरातील पेशी कमी होत असल्याचे प्रमाणात मोठ्या संख्येने झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य खात्याने तातडीने उपायोजना करून नागरिकांचा जीव वाचवावा अशी मागणी नागरिकांतून मोठ्या प्रमाणात होत आहे. डेंगू च्या रुग्णाने शहर व ग्रामीण मधील दवाखाने हाउसफुल होत असल्याचे दिसून येत आहे. डेंगूच्या आजाराने अनवलीतील एका महिलेचा पहिला बळी गेल्याने गावात व परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.