तुळजापूर येथील नवोदय विद्यालयात वसंत पंचमी उत्साहात साजरी..

तुळजापूर येथील नवोदय विद्यालयात वसंत पंचमी उत्साहात साजरी..

------------------------------------------------------------------------------------

तुळजापूर (पंढरी नगरी न्युज) पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी२०२४ रोजी वसंत पंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम विद्यालयाचे  प्रभारी उप प्राचार्य  एस .एच गायकवाड व विद्यार्थी यांच्या हस्ते मा सरस्वतीचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरती चक्रपाणि गोमारे,  श्री हरी जाधव  उपस्थित होते. याप्रसंगी संस्कृती शहाजी जाधव या विद्यार्थिनीने सरस्वती देवी ज्ञानाचा सागर कसा आहे यावरती आपले विचार व्यक्त केले. यानंतर विद्यालयाचे उप प्राचार्य  एस. एच गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना आजच्या वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन विद्येची उपासना करून जास्तीत जास्त ज्ञान संग्रहित करण्याचे व  स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करून भारत देशाच्या विकासाला हातभार लावण्याचे आवाहन सर्व विद्यार्थ्यांना केले. 

यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक वृंद उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हरी जाधव यांनी केले.  शेवटी १४ फेब्रुवारी २०१९ पुलवामा   दहशती  हल्ल्यात प्राण अर्पण केलेल्या सर्व ज्ञात, अज्ञात हुतात्म्यांना दोन मिनिटांचे मौन राखून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.