संत गाडगे महाराजांचा दशसूत्री चा फलक लावण्याचा राज्य शासनाचा निर्णय-- परीट समाजाच्या एकीमुळे शिंदे सरकार नरमले.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""'"""""""""""""""""""""""""""""""""""""
पंढरपूर;(प्रतिनिधी):- केवळ द्वेष पूर्ण भावनेतून एकाएकी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील हटविण्यात आलेला संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री फलक शिंदे सरकारला अखेर पुनर प्रस्तावित करावा लागला मंत्रालयाच्या प्रवेशद्वारांमध्ये पूर्वीपासून संत गाडगेबाबा महाराज यांचा गेली अनेक वर्षापासून दशसूत्रीच्या फलक बसण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणीस यांचे ईडी सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारची घेतलेले जनहिताचे निर्णय बदलण्याचा सरकारने विडाच उचलला होता .त्यातच व्यक्ती द्वेषातून म्हणा किंवा अन्य काही कारणाने मुंबईतील मंत्रालय येथील प्रवेशद्वारावर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा लावलेला फलक एकाएकी हटवून तो गायब करण्यात आला होता.
त्यामुळे राज्यात परीट समाजामध्ये संतापाची लाट उसळली होती. त्याचे परिसर पडसाद समाजात इतरत्र उमटू लागले होते. संत गाडगेबाबा यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वच्छता समाज प्रबोधन आणि समाजकार्यासाठी अर्पित केले होते .संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा फलक काढल्याची ची बातमी राज्यात वाऱ्यासारखी पसरली होती .याबाबत संत गाडगेबाबा मशीन मुंबईच्या अध्यक्ष तथा काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांना ही माहिती समजताच त्या चांगल्याच भडकल्या होत्या त्यांनी या कृतीच्या विरोधात आवाज उठवला होता .
यशोमती ठाकूर या संत गाडगेबाबा महाराज यांच्या कर्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या त्या प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांनी त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहून आपल्या संतप्त भावना कळवल्या होत्या .पूर्वीप्रमाणे तो फलक लावण्याचा आग्रह धरला होता त्याच्यासोबत राज्यातील परीट समाजाने ही हा विषय प्रसारमाध्यमातून लावून धरला होता अखेर यशोमती ठाकूर यांनी संत गाडगेबाबा महाराजांच्या दशसूत्रीचा हलका चा मुद्दा लावून धरल्याने शेवटी सरकारला समाजापुढे आपला निर्णय मागे घ्यावा लागला.
संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीचा फलक येत्या दोन दिवसात नव्याने लावण्यात येईल.
अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या उल्लेख मिटवून मंत्रालयात दशसूत्री चा फलक त्याच जागी पुनर्नस्थापित करण्यात येईल
त्यामुळे जनतेच्या प्रतिनिधीक वास्तुत पुन्हा एकदा गाडगेबाबांचा विचार तेवत राहतील अशी भावना समाजात सगळीकडे होत आहे.