प्राचार्य डॉ.एस.एस.गोरे यांची सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या मूल्यमापन समितीवर बिनविरोध निवड.

प्राचार्य डॉ.एस.एस.गोरे यांची सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या मूल्यमापन समितीवर बिनविरोध निवड.

-----------------------------------------------------------------------------
सोलापूर( प्रतिनिधी ) :- बार्शी येथील शिवाजी शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एस. गोरे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या शैक्षणिक मूल्यमापन या अभ्यासक्रमाच्या समितीवर बिनविरोध निवड झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .

प्राचार्य एस. एस. गोरे हे मूळचे पंढरपूर तालुक्यातील त. शेटफळ येथील रहिवासी असून अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाल्याने त्यांनी आपले शिक्षण फार हलाकीतून घेतले ते लहान असतानाच वडिलांचे कृपाक्षेत्र हरपल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले .अशा हलकीच्या परिस्थितीतून ही डॉ.एस. एस. गोरे यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या शैक्षणिक कामातील गुणवत्ता पाहून त्यांना बार्शी येथील समाजसेवक जगदाळे मामा यांच्या छत्रपती शिवाजी शिक्षण शास्त्र प्रसारक मंडळ महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी या संधीचे सोने  केले व प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले शिवाजी शिक्षण शास्त्र महाविद्यालय थोड्याच कमी कालावधीत आपल्या कार्याची शैक्षणिक चुणूक दाखवून हे शैक्षणिक क्षेत्र आज नावारूपास आणले प्राचार्य डॉक्टर एस.एस. गोरे गेली ३० वर्ष शिक्षण क्षेत्रातील विकासात भरीव काम करीत आहेत याच कार्याची दखल घेऊन आज पर्यंत त्यांना अनेक शैक्षणिक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणारा आदर्श प्राचार्य पुरस्कार केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते विद्यापीठात मोठ्या कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण करण्यात आला होता. इ. अशा अनेक शैक्षणिक कामाची दखल घेऊन जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थेतील अध्यक्ष .प्राचार्य .कर्मचारी यांच्या सहकार्याने काल नुकत्याच पार पडलेल्या विद्यापीठाच्या (सिनेट) प्राधिकरणाच्या निवडणुकीत डॉ.एस. एस. गोरे यांची शैक्षणिक क्षेत्रातील ३० वर्षाचा अनुभवाचा विचार करून व त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक मूल्यमापन या अभ्यास मंडळावर  बिनविरोध निवड करण्यात आली.

शिवाजी शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एस. गोरे यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी प्रथम स्वागत पर सत्कार करून शुभेच्छा दिल्या. तसेच प्र- कुलगुरू डॉक्टर राजेश गादेवार .कुलसचिव डॉ.योगिनी घारे. बार्शी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय पाटील .उपाध्यक्ष नंदन जगदाळे .जनरल सेक्रेटरी पी टी पाटील .सहसचिव अरुण देबडवार सर .खजिनदार बापूसाहेब शितोळे. वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी जाधव इत्यादी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था मधील प्राध्यापक. शिक्षक शिक्षकेतर. कर्मचारी यांनी निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.