पंढरपूरात मराठा सेवा संघ व डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

पंढरपूरात मराठा सेवा संघ व डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

--------------------------------------------------------------------------------
मंगळवार दि. २९ रोजी सांय.६ वा. भव्य- दिव्य वातावरणात पुरस्काराचे वितरण  होणार
--------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज) मराठा सेवा संघ व डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद शाखा, पंढरपूर यांच्या वतीने क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेल्या   शिक्षक व शिक्षिका सत्कार व सन्मान प्रमुखांची नुकतीच घोषणा करण्यात आली असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद पुरस्कार वितरण सन्मान सोहळा सत्कार समितीच्या वतीने देण्यात आली,

मंगळवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६, वाजता, जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटी कार्यालयाच्या समोर विठ्ठल इन(  हाँल)येथील कार्यालयात या गुणवंत शिक्षक पुरस्काराचे मोठ्या उत्साहात वितरण करण्यात येणार आहे, सालाबाद प्रमाणे सन २०२२/२३ यावर्षी मराठा सेवा संघ व डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद पंढरपूर यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुकास्तरीय राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार शिक्षक व शिक्षिका यांच्या निवडी करण्यात आले असून पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षक  व शिक्षिका खालील प्रमाणे --

अंगणवाडी विभाग( तिसंगी )येथील अंगणवाडी सेविका- सीता संतोष दुबे, जिल्हा प्राथमिक शाळा विभाग -१) राणी नवनाथ गायकवाड जि .प .प्राथमिक शाळा पवार वस्ती, उंबरगाव तालुका पंढरपूर ,२) सिद्धेश्वर हिरामण भोई जि .प .प्राथमिक शाळा, पुळूज केंद्र ,ता.पंढरपूर, ३) सुचिता विष्णुपंत पाटील( बिरादार )जि .प .प्राथमिक शाळा नेमतवाडी ता. पंढरपूर ,४)दत्तात्रेय नामदेव काशीद जि प प्राथमिक शाळा, टप्पा केंद्र भंडी शेगाव, ता. पंढरपूर,   ( शाळा विभाग) जिल्हा प्राथमिक शाळा --रोपळे केंद्र बाभूळगाव ता. पंढरपूर माध्यमिक विभाग १) परमेश्वर उत्तमराव झांबरे ,(सिद्धनाथ विद्यालय ७वा . मैल मु.पोस्ट कासेगाव )ता.पंढरपूर २)शिवाजी गजेंद्र नागटिळक- (मोहसीन विद्यालय इसबावी ,पंढरपूर ,३)नितीन दत्तात्रय दगडू रणदिवे--( मातोश्री सरूबाई माने विद्यालय भटुंबरे )तालुका पंढरपूर, ४)रमेश भिवाजी देठे --(विद्या विकास प्रशाला, लक्ष्मी टाकळी ता. पंढरपूर )या गुणवंत शिक्षक व शिक्षिका या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत .

या पुरस्काराचे वितरण पंढरपूरचे थोर संत बद्रीनाथ महाराज तनपुरे- अध्यक्ष संत तनपुरे महाराज ट्रस्ट पंढरपूर ,यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे ,तर कार्यक्रमासाठी गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन संस्थेचे सचिव डॉ, बी पी रोंगे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून, महाराष्ट्र जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब काळे गुरुजी ,पंढरपूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे सिंधुदुर्ग ज्युनियर कॉलेज शिक्षक संघाचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रा, लक्ष्मण गोडसे, पंढरपूर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नितीन दत्तात्रय जाधव ,डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष- ह .जा. भोसले गुरुजी ,डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे परिषदेचे माध्यमिक तालुका अध्यक्ष- भारत पाटील सर हे प्रमुख उपस्थित राहणार असून कार्यक्रमास प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक बांधव ,शिक्षिका भगिनी यांनी मोठ्या संख्येने भव्य दिव्य पुरस्कार वितरण होणाऱ्या सत्कार सन्मान सोहळा समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक पुरस्कार वितरण सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.