श्री. विठ्ठल सहकारी कारखाना कार्यस्थळावर हुरडा पार्टीचे आयोजन- चेअरमन अभिजीत पाटील

श्री. विठ्ठल  सहकारी कारखाना कार्यस्थळावर हुरडा पार्टीचे आयोजन- चेअरमन अभिजीत पाटील

------------------------------------- 

पंढरपूर (पंढरी नगरी न्युज ) गुरसाळे ता. पंढरपूर येथील श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणू नगर  येथे यंदाही हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले .असल्याची माहिती विठ्ठल परिवाराचे नेते चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली. सालाबाद प्रमाणे शनिवार दि.२० रोजी ते शुक्रवार दि. २६ पर्यंत कालावधीत दुपारी ३. ते सायंकाळी ६. वाजेपर्यंत हुरडा पार्टी मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे .

या हुरडा पार्टीचे पंढरपूर- मंगळवेढा ,माढा ,मतदार संघातील आजी - माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य  नगरपरिषदेचे आजी- माजी नगरसेवक , शहरातील व्यापारी, आजी - माजी सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी संचालक शेतकरी सभासद अधिकारी कर्मचारी श्री.विठ्ठल परिवारातील तालुक्यातील सर्व कार्यकर्ते हितचिंतक यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर हुरडा पार्टी कार्यक्रमाचा लाभ व संवाद साधण्यासाठी आवर्जून  कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन विठ्ठल परिवाराचे नेते तथा श्री .विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे.