राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या (अजित पवार गटाच्या) सोलापूर जिल्हा शहर उपाध्यक्षपदी शत्रुघ्न कांबळे यांची निवड...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या (अजित पवार गटाच्या) सोलापूर जिल्हा शहर उपाध्यक्षपदी शत्रुघ्न कांबळे यांची निवड...

---------------------------------------------------------------------------------

सोलापूर (पंढरी नगरी न्यूज) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग सोलापूर शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते शत्रुघ्न सुखदेव कांबळे यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा व शहर कार्यकर्त्यांमध्ये  उत्साहाचे वातावरण पसरले आहे. शत्रुघ्न कांबळे यांनी आजपर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यात गोरगरीब साठी अनेक सामाजिक उपक्रम राबवत असून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा जनाधार असल्यानेच त्यांची कामाची दखल घेऊन (अजित पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर शहर उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देण्यात आले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक विभागाचे कार्याध्यक्ष व वसीम बुहरान, सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार ,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ बळेनवरू, कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, यांच्या उपस्थितीत शत्रुघ्न कांबळे यांना नियुक्त पत्र देण्यात आले. शत्रुघन कांबळे हे पंढरपूर तालुक्यातील तपकीर शेटफळ येथील रहिवाशी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.

वाचनालयाच्या वतीने दरवर्षी तालुक्यातील गोरगरीब, होतकरू विद्यार्थी- विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गणवेश वाटप करीत असतात. त्यांच्या  निवडीने पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून निवडीचे स्वागत होत आहे. सोलापूर शहर उपाध्यक्षपदी निवड झालेले शत्रुघ्न कांबळे यावेळी" दै पंढरी नगरी न्युज ,च्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष बळकट करण्यासाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवून आपण शोषित पीडित निराधार बहुजन समाजाला न्याय देऊन बहुजन समाजाचे राहणीमान उंचावण्याकरिता आपण अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले .