ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा पूर्णत्वाकडे : डॉ. विजयकुमार सरडे

ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा पूर्णत्वाकडे : डॉ. विजयकुमार सरडे

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर(दै.पंढरी नगरी न्यूज) : काही वर्षांपूर्वी लहानसहान आजारांच्या उपचारासाठी शहरांकडे जावे लागत होते. परंतु आता ग्रामीण भागामध्ये मेडिकल स्टोअर्स  व हॉस्पिटल निर्माण होत असून यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येते. याचाच प्रत्यय या शिवराय मेडिकलच्या माध्यमातून नागरिकांना येणार आहे. असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी  डॉ. विजयकुमार सरडे यांनी केले.

पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे गायकवाड कुटुंबीयांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शिवराय मेडिकल व आरोग्य सुविधा याच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी डॉ विजयकुमार सरडे बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी ग्रामीण भागातील आरोग्य समस्या व त्यावर मात करण्यासाठी निर्माण होणाऱ्या शिवराय मेडिकल सारख्या सुविधा याची माहिती दिली.

या कार्यक्रमाप्रसंगी पांडुरंग पवार,  वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विलासराव भोसले, माजी प.स सदस्य महेश कदम, रयतच्या जनरल बॉडीचे सदस्य बाळासाहेब पाटील,  संचालक जनक भोसले, ग्रा. प. सदस्य नितीन कदम, अनिल कदम, औदुंबर गायकवाड, विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, डॉ.  हनुमंत खपाले, डॉ महावीर शहा  , डॉ. आर. एन.मुळे,  डॉ प्रसाद तोडकरी, डॉ. विजय पाटील, डॉ महेश शिंदे, डॉ विशाल होळकर , डॉ उत्तम कदम,  डॉ नागणे, डॉ युवराज कदम, डॉ नितीन पवार, डॉ गणेश गोडसे, डॉ महेश कोळी, डॉ.ऋतुराज चव्हाण आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाप्रसंगी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम, विलास भोसले, माजी कृषी अधिकारी मधुकर गुंजाळ, शिवाजी भोसले यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार नारायण गायकवाड यांनी मानले.