बुद्धीवंत परीक्षेत जि .प . प्राथमिक केंद्र शाळा सिद्धेवाडी विद्यार्थ्यांचे घवघवीत उत्तुंग यश
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर(दै .पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनी 17 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेल्या शासनाच्या बुद्धिवंत परीक्षेत कु. नियती नितीन जाधव या विद्यार्थिनी जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावल्याने सिद्धेवाडीत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिद्धेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इ.1.तील विद्यार्थिनी नियती नितीन जाधव हिने घेण्यात आलेल्या बुद्धिवंत परीक्षेत 150 पैकी 140 गुण प्राप्त करून जिल्ह्यात दुसरा क्रमांक येण्याचा मान मिळवला आहे. त्याचबरोबर सिद्धेवाडी केंद्रात इयत्ता पहिली विद्यार्थी अन्वित विठ्ठल जाधव, कुमारी प्रांजली जितेंद्र जाधव ,तनिष्का समाधान भोपळे, या विद्यार्थिनी प्रत्येकी तिघांनी प्रथम क्रमांक मिळवून केंद्रात धबधबा निर्माण केला आहे.
यश मिळवलेले विद्यार्थी खालील प्रमाणे-- ऋषिकेश शैलेश जाधव , आदित्य सोमनाथ गोडसे, अंजली महेश जाधव, सिद्धी प्रवीण जाधव, प्रांजली विजय शिंदे, अभय अमित भोपळे, प्राजक्ता विशंभर जाधव, आरोही गणेश जाधव, त्वरा समाधान जाधव, यश नागेश जाधव, आरोही समाधान शिंदे, समृद्धी जितेंद्र जाधव ,सायली सोमनाथ जाधव, जीवन नवनाथ गोडसे, शंभूराजे दीपक जाधव , परी किरण जाधव, या विद्यार्थ्यांनी प्रगतीच्या युगात गुणवत्तेत मोठी भरारी घेऊन मोठे यश संपादन केल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणी सारंग जाधव, उपसरपंच लक्ष्मण गोडसे, केंद्रप्रमुख महादेव पवार ,मुख्याध्यापिका भालेकर मँडम, जाधव- नागणे वस्ती शाळेचे मुख्याध्यापक एम. बी. जाधव ,पोलीस पाटील- दत्तात्रय जाधव , चव्हाण मॅडम ,शहाजी गोडसे ,कोळी मॅडम ,ग्रामसेवक शहाजी शेणवे, कासेगांव मंडल अधिकारी बाळासाहेब मोरे ,गाव कामगार तलाठी अश्विनी शेंडे ,गावातील अधिकारी वर्ग, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी यांनी लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांनी यश मिळवल्याबद्दल कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले .