भालेवाडी ग्रामपंचायतीत दिव्यांग दिन साजरा व मेळाव्याचे आयोजन..
---------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज ) : मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी येथे ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ.श्रीकांत दवले यांच्या उपस्थितीत दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व दिव्यांग व्यक्तींचे सरपंच डॉ. श्रीकांत दवले यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. व दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यात आली .तसेच त्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी सदर कार्यक्रमासाठी उपसरपंच लिंगेश्वर गवळी सर्व ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ गवळी, ग्रामसेवक मा. डीजे गायकवाड , गणेश बाळासाहेब गवळी, दामाजी शिवशरण ,ज्ञानेश्वर गवळी, विजय गायकवाड, महेश गवळी, विजय बाबर पांडुरंग गवळी महाराज, ग्रामपंचायत कर्मचारी आप्पा घाडगे,निखिल भोरकडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.