श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी मध्ये ७५ वा "प्रजासत्ताक दिन" साजरा
------------------------------------------------------------------------------------
बार्शी (पंंढरी नगरी न्यूज) श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे दिनांक २६ जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी सकाळी ठिक ८: १५ वाजता प्रमुख पाहुणे कमल पारसमल कांकरिया व सौ.दिपाभाभी सहपत्तीनिक यांच्या शुभ हस्ते झेंडा वंदन व राष्ट्रगीत सादर करण्यात आले. नंतर प्रमुख पाहुणे यांचा श्रीफळ व मोत्याची माळ देऊन वाचनालयाचे संचालक आशोक कांकरिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.दिपाभाभी कांकरिया यांचा सत्कार रश्मी पुनमिया यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ,संचालक धिरज कुंकूलोळ,रूपेश कांकरिया,अशोक कांकरिया,प्रमोद भंडारी. श्रीजैनाश्रमचे ट्रस्टी,सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ,व वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन वाचनालयाचे संचालक धिरज कुंकूलोळ,यांनी केले.ग्रंथपाल सुरेश यादव यांनी आभार मानले.कार्यक्रमानंतर वाचनालया तर्फे अल्पोपहार व चहापाणी ठेवण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव,पल्लवी तौर,विराज पंतगे यांनी परिश्रम घेतले.