अवकाळी पावसाने पिकांचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणार :- माजी आमदार प्रशांत परिचारक नुकसानग्रस्त पिकशेतीची परिचारक यांनी केली पाहणी
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील नांदोरे, पेहे, नेमतवाडी, शेवते भागात अवकाळी पावस व वादळीवाऱ्या मुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पाहणी केली.

पंढरपूर तालुक्यातील अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्या मुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच ग्रामस्थांच्या राहत्या घरावरील, शाळेवरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले आहेत आज प्रत्यक्ष भेट देऊन येथील नुकसानाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि नुकसानाचा आढावा घेतला.

वादळामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण केळीबागांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेती पिकातील केळीचे एकही खोड जिवंत राहिलेले नाही, केळीचे हे अतोनात नुकसान झालेले आहे.

या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकर्यांना धीर देत, प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून लवकरच शेतकऱ्यांना शासनाकडून मदत करण्याचे आश्वासन दिले .या नागरिकांना शासनामार्फत शक्य तेवढी मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे असे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आश्वासन दिले.
यावेळी पांडुरंग शुगरचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे, संचालक तानाजी वाघमोडे, मा. संतोष भिंगारे, सोलापूर जिल्हा दूध संघाचे माजी संचालक बाळासाहेब माळी आदी उपस्थित होते.